वाढत्या उन्हातही ४१२ ज्येष्ठांनी केले लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST2021-03-19T04:28:38+5:302021-03-19T04:28:38+5:30
हिंगोली : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढू लागला तरीही ज्येष्ठ मंडळी लसीकरणासाठी पुढाकार घेताना दिसून येत आहे. गुरुवारी ४१२ ज्येष्ठांनी ...

वाढत्या उन्हातही ४१२ ज्येष्ठांनी केले लसीकरण
हिंगोली : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढू लागला तरीही ज्येष्ठ मंडळी लसीकरणासाठी पुढाकार घेताना दिसून येत आहे. गुरुवारी ४१२ ज्येष्ठांनी आरोग्य विभागाच्या विविध संस्थेत लसीकरण करून घेेतले.
गत आठवड्यापासून उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामुळे ज्येष्ठ मंडळी ऊन तापायच्या आत जवळच्या दवाखान्यात जाऊन लसीकरण करून घेत आहेत. असे असताना तरुण मंडळी मात्र लसीकरणासाठी पुढाकार घेताना दिसून येत नाहीत. १८ मार्च रोजी खासगी दवाखाने वगळता शासनाच्या २९ आरोग्य केंद्रात ४१२ ज्येष्ठांनी, तर ४५ ते ६० वर्षांखालील इतर आजार असणाऱ्यांनी लसीकरण करून घेतले. गुरुवारी दुसरा डोस लसीकरणाची संख्या ६२, इतर विभागातील कर्मचारी ३४९, आरोग्य कर्मचारी ४४ यांचा समावेश असून, गुरुवारी एकूण ८९२ जणांनी लसीकरण करून घेतले. आजपर्यंत २० हजार ११९ जणांचे लसीकरण प्रगतिपथावर असल्याचे पहायला मिळत आहे.