शिवजयंतीनिमित्त विविध समित्यांची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST2021-02-09T04:32:49+5:302021-02-09T04:32:49+5:30
या संदर्भात एनटीसी भागात छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरात ७ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीची बैठक पार पडली. ...

शिवजयंतीनिमित्त विविध समित्यांची स्थापना
या संदर्भात एनटीसी भागात छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरात ७ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विस्तारित कार्यकारिणी व समित्यांची स्थापना करण्यात आली. यामध्ये शिवसन्मान महिला मॅरेथॉन समिती प्रमुखपदी ज्योतीताई वाघमारे, कोरोना योद्धा सन्मान समिती प्रमुखपदी रेखाताई शिंदे, ज्योतीताई पवार, ऐतिहासिक एकपात्री वेशभूषा व संवाद समिती प्रमुखपदी जिजाताई सावके व कांताताई कल्याणकर, रांगोळी स्पर्धा समिती प्रमुखपदी योगिताताई देशमुख, दीपोत्सव समिती प्रमुखपदी सुनीताताई सवनेकर, शिवपूजन समिती प्रमुखपदी वंदनाताई आखरे, रक्तदान व आरोग्य समिती प्रमुखपदी ज्योतीताई भिसे व उज्ज्वला वगेवार, विचार पीठावरील मुख्य कार्यक्रम समिती प्रमुखपदी वर्षाताई सरनाईक व अर्चना देशमुख, लहान बालकांच्या शिवगीत, शिवपोवाडा, नाट्य, एकांकिका, देखावा स्पर्धेच्या समिती प्रमुखपदी लीनाताई जाधव, भोजन समिती प्रमुखपदी अरुणाताई ठाकरे व कांताबाई कल्याणकर, बॅचेस वितरण समिती प्रमुखपदी संगीताताई देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक समितीमध्ये दहा महिला सदस्यांचा समावेश आहे. या समितीमार्फत १८ व १९ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.
विस्तारित कार्यकारिणीत उपाध्यक्ष व सहसचिव यांची निवड
रविवारी झालेल्या शिवजयंती महोत्सव समितीच्या बैठकीमध्ये जंबो कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये उपाध्यक्षपदी अनिताताई सूर्यतळ, संगीताताई निलावार, शोभाताई माने, संगीताताई दराडे, परवीन शेख, तर सहसचिवपदी डॉ. राधाकाताई देशमुख, अर्चनाताई जाधव, यशोदाताई कोरडे, जयाताई पवार, वैशालीताई गोटे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच समिती सदस्यपदी शंभर सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
शिवजयंतीनिमित्त रंगरंगोटीचे काम सुरू
हिंगोली : १९ फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवराय पूर्णाकृती पुतळा परिसरात रंगरंगोटी व इतर कामे हाती घेण्यात आली आहेत. मूर्तिकार संताजी घोरपडे हे त्यांच्या सहकाऱ्यासह कोल्हापूरहून हिंगोली येथे दाखल झाले असून, छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नव्याने रंग देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम दोन दिवसांत पूर्ण होणार आहे. तसेच चबुतऱ्यावरील पुसट झालेली राजमुद्रेची प्रतीकृती नव्याने बसविण्यात आली आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवराय पूर्णाकृती पुतळा परिसरात विद्युत रोषणाईचे काम हाती घेण्यात आले आहे. या संदर्भात ८ फेब्रुवारी रोजी पुतळा समितीचे अध्यक्ष माजी आ. भाऊराव पाटील-गोरेगावकर, कार्याध्यक्ष आ. तान्हाजीराव मुटकुळे यांच्यासह सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पाहणी केली. यंदा प्रथमच सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारिणीवर महिलांची निवड करण्यात आली आहे. महिला समितीच्या मार्गदर्शनाखालीच यंदाच्या शिवजयंतीचे संपूर्ण नियोजन सुरू आहे. फोटो नं. २४