६७५८ शेतक-यांच्या कर्जमाफी अर्जात त्रुट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:22 IST2018-02-13T00:22:21+5:302018-02-13T00:22:24+5:30
संपूर्ण कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत तालुक्यातील ३६ हजार ३११ शेतकºयांनी महा ई सेवा केंद्रामार्फत आॅनलाईन अर्ज भरले होते. त्यापैकी ६७५८ शेतकºयांच्या कर्जमाफीच्या अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या त्रुटींची पूर्तता करता करता पुन्हा शेतकºयांच्या नाकी नऊ येत आहेत.

६७५८ शेतक-यांच्या कर्जमाफी अर्जात त्रुट्या
शेख इलियास ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : संपूर्ण कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत तालुक्यातील ३६ हजार ३११ शेतकºयांनी महा ई सेवा केंद्रामार्फत आॅनलाईन अर्ज भरले होते. त्यापैकी ६७५८ शेतकºयांच्या कर्जमाफीच्या अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या त्रुटींची पूर्तता करता करता पुन्हा शेतकºयांच्या नाकी नऊ येत आहेत.
बँकेने त्रुटींची यादी बँकेत लावली आहे. आॅनलाईन अर्जात नावात दुरूस्ती, खाते क्रमांक आधार क्रमांक नाव बदल, कर्ज नसणारे शेतकरी, मयत आदी त्रुटी आढळून आल्या आहेत. तालुकास्तरीय कर्जमाफी समिती शासनाने दिलेल्या निकषानुसार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र की अपात्र याची छाननी करीत आहे. येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात कर्जमाफीच्या अर्जाची आॅनलाईन छाननी सहाय्यक निबंधक एस.एल. बोलके, अनिल सुरदाम, राजेश बांडे, प्रल्हाद दाहिरे, डिगांबर शिंदे हे करीत आहेत. ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकºयांनी व ज्या शेतकºयांनी ३१ जुलै २०१७ पर्यंत थकबाकी भरली नाही. अशा शेतकºयांना १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत कर्ज वाटप झालेल्या शेतकºयांना दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ होणार आहे. प्रोत्साहनपर कर्जमाफी योजनेचा लाभ १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत कर्ज घेतलेले असावे व १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ पर्यंत सलग दोन वर्ष कर्ज घेतलेले असावे व त्या कर्जाची परतफेड केलेली असावी तरच या योजनेचा लाभ शेतकºयांना कर्ज माफीसाठी होणार आहे. या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतकºयांना कर्जाच्या २५ टक्के अथवा १५ ते २५ हजारांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. पुनर्गठण कर्जमाफीसाठी ३१ जुलै २०१७ पर्यंत कर्ज थकीत असावे, ३१ जुन २०१६ पर्यंत अथवा त्यानंतर पुनर्गठण केलेले असावे तरच दीड लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे.
निकषानुसार फक्त १० टक्केच शेतकºयांना कर्जमाफ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्रुटीतील आॅनलाईन अर्जापैकी फक्त ५ ते १० टक्केच शेतकºयांना कर्जमाफीची शक्यता आहे. कर्जमाफी व्हावी, यासाठी शेतकºयांनी जीवाचा आटापिटा करून आॅनलाईन अर्ज भरले होते. काही प्रमाणात शेतकरी शांत झाले होते. मात्र बँकेत लावलेल्या त्रुट्याच्या यादीने पुन्हा शेतकºयांमध्ये गोंधळ उडाला असून, ग्रामीण भागातील शेतकरी बँकेत धाव घेऊन त्रुटीची यादी दोन दोन वेळेस पाहत आहेत. त्यामुळे पुन्हा शेतकºयांची गर्दी होत आहे.