जिल्हाधिकाऱ्यांच्या झाडाझडतीनंतर कोरोना वाॅर्डातील प्रवेश बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:27 IST2021-03-24T04:27:43+5:302021-03-24T04:27:43+5:30
हिंगाेली जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच लिंबाळा येथील महिला रुग्णांसाठी उभारलेल्या कोरोना केअर सेंटरला जिल्हाधिकारी जयवंशी यांनी भेट दिली. या ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या झाडाझडतीनंतर कोरोना वाॅर्डातील प्रवेश बंद
हिंगाेली जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच लिंबाळा येथील महिला रुग्णांसाठी उभारलेल्या कोरोना केअर सेंटरला जिल्हाधिकारी जयवंशी यांनी भेट दिली. या ठिकाणी असलेल्या सोयीसुविधांचा त्यांनी आढावा घेतला. आणखी काय सोयीसुविधा करता येतील, याबाबत विचारणा केली. या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांकडून योग्य उपचार केले जातात की नाही, वेळेवर दखल घेतली जाते की नाही, याबाबतही त्यांनी विचारणा केली. तसेच रुग्णालयातील डॉक्टर व इतरांशी चर्चा करून रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी दक्ष राहण्याचे सांगितले.
या ठिकाणी नातेवाईक आल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनाही फटकारले. तसेच सुरक्षा रक्षकामार्फत योग्य कर्तव्य बजावले गेले पाहिजे, अशा सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या. त्यामुळे यापुढे तरी रुग्णालयात कोणाचाही मुक्त प्रवेश दिसणार नाही, असे दिसते जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला जाग आली आहे. अन्यथा, नातेवाइकांना संसर्ग होऊन रुग्णसंख्या वाढण्याची भीती होती.