जिल्ह्यात १३१६ युवकांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:31 IST2021-02-24T04:31:47+5:302021-02-24T04:31:47+5:30
हिंगोली: कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत प्रशिक्षणाबाबत विविध योजना राबविण्यात येत आहेत. गत वर्षात १३१६ युवकांना रोजगार मिळवून ...

जिल्ह्यात १३१६ युवकांना रोजगार
हिंगोली: कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत प्रशिक्षणाबाबत विविध योजना राबविण्यात येत आहेत. गत वर्षात १३१६ युवकांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे.
बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना, किमान कौशल्य विकास कार्यक़्रम, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा समावेश आहे. या योजनेंतर्गत २०२०-२१ मध्ये एकूण २ हजार ४१६ युवकांना प्रशिक्षण द्यावयाचे आहे. सदरील प्रशिक्षण प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव व ट्रेनिंग सेंटर आदीमार्फत देण्यात येणार आहे.
सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे, ऑनलाईन वेबिनार, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. २०२० मध्ये १ हजार ३१६ युवकांना या योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. १२ डिसेंबर ते २० डिसेंबर यादरम्यान राज्यस्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात हिंगोली जिल्ह्यासाठी ५३७ जागांसाठी सात उद्योजक कंपन्यांनी सहभाग नोंदविला.
२२१ लाभार्थ्यांची रक्कम मंजूर
विभागांतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजना राबविण्यात येते. यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा, गट प्रकल्प कर्ज योजना राबविली जाते. महामंडळाकडून आजपर्यंत २२१ लाभार्थ्यांना १३ कोटी ८० लाख १५ हजार २१ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. २२१ पैकी २०७ लाभार्थींना व्याज परतावा मिळाला आहे. व्याज परताव्याची एकत्रित रक्कम ९० लाख ३५ हजार २७१ एवढी आहे.
-प्र.सो. खंदारे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालय