निवडणुकीची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:03 IST2019-03-14T00:03:24+5:302019-03-14T00:03:51+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध कामांची जबाबदारी अधिकाऱ्यांवर सोपविल्यानंतर आता साहित्याच्या जुळवाजुळवीपासून इतर कामांची लगबग सुरू झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

निवडणुकीची लगबग
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध कामांची जबाबदारी अधिकाऱ्यांवर सोपविल्यानंतर आता साहित्याच्या जुळवाजुळवीपासून इतर कामांची लगबग सुरू झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार हे या कामांवर लक्ष ठेवून राहत असून निवडणूक विभागात ते दररोज बैठका घेत आढावा घेताना दिसत आहेत. आचारसंहिता, साहित्य, तांत्रिक मनुष्यबळ, केंद्र स्तरीय मनुष्यबळ अशा विविध बाबींसाठी सहा विधानसभा मतदारसंघातील नियोजनावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.