शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

‘सहज बिजली’ला ३५ कोटींची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 1:01 AM

प्रधानमंत्री सहज बिजली हर घर या योजनेचे (सौभाग्य) सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात एपीएलच्या ४८ हजार २४९ तर बीपीएलच्या २७८0 कुटुंबांकडे वीज नसल्याचे आढळून आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : प्रधानमंत्री सहज बिजली हर घर या योजनेचे (सौभाग्य) सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात एपीएलच्या ४८ हजार २४९ तर बीपीएलच्या २७८0 कुटुंबांकडे वीज नसल्याचे आढळून आले आहे. यासाठी ३५ कोटी लागणार असून सर्वांना आॅक्टोबरपर्यंत वीज जोडणी उपलब्ध करून दिली जाणार आहे.ज्या गोरगरीब कुटुंबांकडे वीज जोडणी नाही, अशांना सवलतीच्या दरात ही जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने ही योजना जाहीर केली होती. मागील महिन्यात या योजनेसाठी सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. या योजनेत आता एकूण एपीएलच्या ४८ हजार २४९ लाभार्थ्यांना जोडणी द्यावी लागणार असल्याचे अंतिमरीत्या समोर आले.ही सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी ११ केव्ही वीजवाहिनी १00 किमीची टाकावी लागणार आहे. तर लघुदाब वीजवाहिनीची ३५0 किमी लांबीच्या कामाची गरज पडणार आहे. याशिवाय जिल्ह्यात ३३४ नवीन डीपींची गरज भासणार आहे. याशिवाय हिंगोली शहरासाठी १४ किमी लघुदाब वाहिनी, ४ डीपींची गरज पडणार आहे. तर आॅक्टोबरपर्यंत ही कामे करण्यासाठी महावितरणला ३५ कोटी रुपयांची गरज भासणार आहे.या योजनेत आधी ९१ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. एपीएलचे तब्बल ५१ हजार तर दारिद्र्य रेषेखालील १७ हजार लाभार्थी असतील, असे अपेक्षित धरले होते. मात्र प्रत्यक्ष पडताळणीत एपीएलची संख्या त्या जवळपास असली तरीही बीपीएलची मात्र अवघी २८00 एवढीच संख्या निघाली.या योजनेच्या सर्वेक्षणात एपीएलचे औंढ्यात ८0१0, वसमतला १0९0५, हिंगोलीत १0४७२, कळमनुरीत ८८५७ तर सेनगावात १000५ एवढे पात्र लाभार्थी आहेत. यांना पाचशे रुपयांत जोडणी मिळेल तर ही रक्कम त्यांना प्रतिमहिना ५0 रुपये याप्रमाणे देयकातच आकारली जाईल.बीपीएलचे औंढा-११३२, वसमत-४९, हिंगोली-0, कळमनुरी-७२0, सेनगाव-६0८ अशी संख्या या योजनेतील आहे. तर याशिवाय १0३00 बीपीएल लाभार्थ्यांना दीनदयाल उपाध्याय योजनेत लाभ मिळणार आहे. त्यात न मिळाल्यास त्यांना याचा लाभ मिळू शकतो.ही कामे करण्यासाठी शासनाने निधीची तरतूद केलेली आहे. जशी निधीची उपलब्धता होईल. तशी ही कामे केली जाणार आहेत. लवकरच ही कामे सुरू होतील, असे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी म्हणाले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण