शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अपमानास्पद वागणुकीचे कथन करताना डीवायएसपी पाटील यांचे डोळे पाणावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 18:19 IST

प्रवासादरम्यान आॅटोलचाकांचा उद्धटपणा व निष्क्रीय पोलीस कर्मचार्‍यांच्या त्रासाला सामोरे जावे लागले. आज हिंगोलीतील पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्या असता त्यांनी याबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीला माहिती दिली.

हिंगोली : मुंबई येथे आॅटोचालक व पोलिसांकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे डीवायएसपी सुजाता पाटील यांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. त्यांना प्रवासादरम्यान आॅटोचालकांचा उद्धटपणा व निष्क्रीय पोलीस कर्मचार्‍यांच्या त्रासाला सामोरे जावे लागले. आज हिंगोलीतील पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्या असता त्यांनी याबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीला माहिती दिली. या धक्कादायक व अपमानास्पद अनुभवाचे कथन करताना त्यांचे डोळे पाणावले होते.

हिंगोली येथे कार्यरत डीवायएसपी सुजाता पाटील भोपाळ येथे ट्रनिंगसाठी गेल्या होत्या. आज त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात येत पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी मुंबई येथे २४ मार्चला त्यांच्या सोबत झालेल्या अपमानास्पद घटनेची माहिती 'लोकमत' प्रतिनिधीला दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनिंग संपवून त्या पंजाब मेलने भोपाळवरुन १७ तास प्रवास केल्यानंतर २४ मार्च रोजी सकाळी दहा वाजता अंधेरी येथे आल्या. यावेळी त्यांच्या पायास दुखापत झाली होती. स्टेशनवर येताच त्यांनी आॅटोचालकास घरी नेऊन सोडण्यास सांगितले. परंतु एकाही आॅटोचालकांनी त्यांना प्रतिसाद न देत उलट त्यांची टिंगल उडविली. त्यामुळे पाटील यांनी परिसरातच काही अंतरावर  असलेल्या पोलिसांना मदत मागितली. त्यांना पायास दुखापत असल्याचेही सांगितले. परंतु पोलिसांनी दुर्लक्ष केले. पोलिसांची मुजोरी पाहून पाटील चांगल्याच भांबावून गेल्या. 

यानंतर रिक्षाचालकावर कारवाई ऐवजी पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांनाच चौकीत बोलावले. यावेळी त्यांनी, " आपली लहान मुलगी घरी तापाने फणफणत आहे, त्या रिक्षावाल्यांना मला घरी नेऊन सोडायला सांगा " अशी विनवणी केली. परंतु, त्यांच्या विनवणीकडे पोलिसांनी साफ दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे डीवायएसपी पाटील यांनी त्या पोलीस अधिकारी असल्याची ओळख दिली नाही. सर्वसामान्यांना चौकीत कशी वागणूक दिली जाते, हे त्यांना बघायचे होते. या अनुभवाने त्यांना चांगलाच धक्का बसला. यानंतर हा अनुभव त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे शेअर केला. दरम्यान, आपल्याच विभागातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांना मिळालेल्या वागणुकीने हादरलेल्या पोलीस विभागाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

अनुभव कथन करताना झाल्या भाऊकया सर्व घटनेचा तपशील दिल्यानंतर त्यांनी सर्वसामान्य महिलांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली. स्वतः सोबत घडलेल्या या धक्कादायक व अपमानास्पद अनुभवाचे कथन करत असताना त्यांचे डोळे पाणावले होते.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईHingoliहिंगोलीRailway Passengerरेल्वे प्रवासी