मुंबईतल्या रिक्षाचालकांच्या मुजोरीचा महिला DYSPना फटका; FBवरून व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 10:42 AM2018-03-26T10:42:25+5:302018-03-26T10:46:43+5:30

हिंगोलीच्या डीवायएसपी सुजाता पाटील यांनी मुंबईच्या रिक्षाचालकांचा उद्दामपणा फेसबुकवर सांगितला आहे.

hingoli dysp sujata patil shared her bad experience with rickshaw in mumbai | मुंबईतल्या रिक्षाचालकांच्या मुजोरीचा महिला DYSPना फटका; FBवरून व्यक्त केला संताप

मुंबईतल्या रिक्षाचालकांच्या मुजोरीचा महिला DYSPना फटका; FBवरून व्यक्त केला संताप

Next

मुंबई- रिक्षाचालकांचा उद्दामपणा, मनमानी कारभार सर्वसामान्य मुंबईकर नेहमीच अनुभवतात. ऑफिसला जाताना-येताना नेहमीच रिक्षाचालकांच्या वागणुकीला सामोरं जावं लागतं. सर्वसामान्य लोकांप्रमाणेच हिंगोलीच्या डीवायएसपींनाही याचा अनुभव आला आहे. हिंगोलीच्या डीवायएसपी सुजाता पाटील यांनी मुंबईच्या रिक्षाचालकांचा उद्दामपणा फेसबुकवर सांगितला आहे. मुंबईतील अंधेरी स्थानकावर आपण पोलीस असल्याची ओळख त्यांनी दाखवली नाही. त्यामुळे मुजोर रिक्षाचालक प्रवाशांसोबत कसे वागतात, याचा अनुभव त्यांना आला.

महिला प्रवाशांचा अपमान पोलिसांकडूनही कसा केला जातो, याची प्रचिती सुजाता पाटील यांना आली. समोर पोलीस बसलेले असतानाही रिक्षाचालक कसे वागतात त्याचा अनुभव आल्याचं सुजाता पाटील यांनी सांगितलं. ओळख न सांगता पोलीस महिलांची मदत करतात का ते पाहायचं होतं, पण पोलिसांनी मदतीऐवजी अपमान केला. महिला कधी सुरक्षित होतील, असा प्रश्न सुजाता पाटील यांनी फेसबुक पोस्टमधून उपस्थित केला.

 फेसबुक पोस्टमध्ये सुजाता पाटील यांनी म्हंटलं आहे की, 
''आज २४ march 2018.....सकाळी 15 तास प्रवास करुन भोपाळ ते मुंबई गाठली, पंजाब मेल ३ तास लेट होती. खुप थकले होते. पाय़ fracture . मुलगी आजारी जीव कासावीस झाला होता. लंगडत लंगडत बॅगा ओढत सकाळी १० वा अंधेरी गाठली. अंधेरीत(प)  नेहमीच रिक्षावाले प्रवाशाना छळवणुक करतात. नेहमीप्रमाणे रिक्षावाले भाडे नकार. कोणाला काही देणंघेण नाही. समोर पोलीस शिपाई १०० फूट खुर्चीत बसुन,  हा सगळा उतमात पोलीसांसमोर सुरू.  मी माझी ओळख सांगायची नाही ठरवलंच होतं.  पोलीस चौकीत पोलीस मदत मागता पोलीस शिपाई धनवडे व शिर्के डि.एन.नगर पोलीस. आरामात बसुन. ईशारा केला पण पोलीस सांगतो येणार नाही.  बॅगा ओढत चौकीत जावुन रिक्षावाले भाडे नाकारत आहेत सांगता , ऑन duty वरील पोलीस शिपाई दोघानी १० मिनीटे उनमत बोलुन माझा भरभरुन  अपमान केला. मला क्षणभर काहीच कळेना.  एका प्रवाशी महिलेचा अपमान कशाप्रकारे केला जावू  शकतो आज अनुभव घेतला. डोळे पानावले. अजूनही समजत नाही.  महिला कधी सुरक्षीत होतील . .हा होता माझा आजचाएका प्रवासी महिलैचा कटु अनुभव. जयहिंद. .''

रिक्षाचालकांची तक्रार पोलिसाकडे करायला गेले, त्यावेळी पोलीस उद्दामपणे बोलत होते, नाव विचारल्यावर, तुला नाव काय करायचं आहे, तू काय वाकडं करणार आहेस म्हणाले, असा प्रश्न पोलिसांनीच विचारला. मी नोकरी पणाला लावून फेसबुक पोस्ट लिहिली आहे. सरकारने मला काहीही शिक्षा दिली तरी मी तयार आहे. मला मदत मिळत नसेल, तर सर्वसामान्यांना कशी मदत मिळेल? माझं डिपार्टंमेंट सुधारावं याच हेतूने मी माझी व्यथा फेसबुकवर मांडली, अशी प्रतिक्रिया सुजाता पाटील यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. 

दरम्यान, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सुजाता पाटील यांच्याबरोबर घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

Web Title: hingoli dysp sujata patil shared her bad experience with rickshaw in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई