इसापूर धरणाच्या पाण्यात बुडून विवाहितेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:17 IST2019-03-30T00:16:50+5:302019-03-30T00:17:09+5:30
तालुक्यातील मोरगव्हाण येथील एका विवाहितेचा इसापूर धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना २९ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घडली.

इसापूर धरणाच्या पाण्यात बुडून विवाहितेचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी: तालुक्यातील मोरगव्हाण येथील एका विवाहितेचा इसापूर धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना २९ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घडली.
मोरगव्हाण येथील पूजा भूजंग मस्के(२२) ही विवाहिता धुणे धुण्यासाठी दुपारच्या वेळी इसापूर धरणावर गेली होती. यात धरणात बुडून तिचा मृत्यू झाला. पूजा लवकर घरी न आल्याने घरच्यांनी धरणाकडे धाव घेतली. तिचे प्रेत पाण्यात आढळून आले. ही माहिती मोबाईलद्वारे पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोनि जी.एस.राहीरे, फौजदार श्रीराम जामुंगे, गिरीश कदम, नामदेव जाधव यांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने प्रेत पाण्याबाहेर काढले. सांयकाळी ६ वाजता प्रेत शवविच्छेदनासाठी आणले. यावेळी मयत पूजाचे आई-वडील ग्रामीण रूग्णालयात आले. शवविच्छेदन करू नका, असे म्हणत संशय, आक्षेप घेतला. रात्री ८.३० वाजेपर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते. मयत पूजाच्या माहेरच्यांची पोलिसांसोबत आक्षेपाबाबत चर्चा सुरू होती. मयत पूजा हिचे लग्न मागील वर्षी झाले होते. त्यांना एकही अपत्य नाही.