चालक, वाहकांनी मास्क नाही घातल्यास ड्युटीच बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:20 IST2021-06-21T04:20:35+5:302021-06-21T04:20:35+5:30

हिंगोली: कोरोना महामारी ओसरत चालली असली तरी कोरोनाचे रुग्ण रोजच आढळून येत आहेत. हे पाहून एस.टी. महामंडळाच्या चालक-वाहकांनी स्वत: ...

Duty off if driver, carrier does not wear mask | चालक, वाहकांनी मास्क नाही घातल्यास ड्युटीच बंद

चालक, वाहकांनी मास्क नाही घातल्यास ड्युटीच बंद

हिंगोली: कोरोना महामारी ओसरत चालली असली तरी कोरोनाचे रुग्ण रोजच आढळून येत आहेत. हे पाहून एस.टी. महामंडळाच्या चालक-वाहकांनी स्वत: मास्क घालून प्रवाशांना मास्क घातल्याशिवाय बसमध्ये चढू देऊ नये. कोरोनाचे नियम मोडल्यास चालक-वाहकांची ड्यूटीच बंद करण्यात येईल, असा इशारा स्थानकप्रमुख संजयकुमार पुंडगे यांनी दिला आहे.

कोरोना महामारी ओसरू लागल्याचे पाहून शासनाने ७ जूनपासून मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, बुलडाणा, नांदेड, परभणी, अकोला आदी लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू करण्यासाठी एस.टी. महामंडळाला सूचना केली होती. शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरून महामंडळाने एस.टी. बसेस सुरू केल्या आहेत. लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू केल्या त्यावेळेसच चालक-वाहकांना मास्क घालण्याचे बंधन घालण्यात आले आहे. परंतु, काही दिवसांपासून चालक-वाहक मास्क घालत नाहीत, हे निदर्शनास येत आहे. यापुढे चालक-वाहकांनी मास्क न घालता प्रवाशांसोबत प्रवास घेतल्यास त्यांची ड्यूटीच बंद करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. सद्य:स्थित हिंगोली आगारात १२० चालक आणि १२५ वाहकांची संख्या आहे.

ग्रामीण भागातील बसेसबाबत सूचना नाही...

लांब पल्ल्यांच्या बसेस जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनेच सुरू केल्या आहेत. या बसेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागातील बसेस सुरू करण्याबाबत काही प्रवाशांनी महामंडळांकडे विचारणा केली होती. परंतु, जिल्हा प्रशासनाने काहीच सूचना दिली नसल्यामुळे अजून तरी ग्रामीण भागातील बसेस सुरू करता येणार नाहीत. जिल्हा प्रशासनाने सूचना केल्यास ग्रामीण भागातील बसेस सुरू केल्या जातील.

Web Title: Duty off if driver, carrier does not wear mask