कोरोना काळात ग्रामीण रुग्णालयांनी घेतली गरोदरमातांची काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:52 IST2021-02-05T07:52:26+5:302021-02-05T07:52:26+5:30
जिल्ह्यात हिंगोली येथे एक जिल्हा रुग्णालय, वसमत येथे महिला रुग्णालय, कळमनुरी व वसमत येथे २ उपजिल्हा रुग्णालय आणि ...

कोरोना काळात ग्रामीण रुग्णालयांनी घेतली गरोदरमातांची काळजी
जिल्ह्यात हिंगोली येथे एक जिल्हा रुग्णालय, वसमत येथे महिला रुग्णालय, कळमनुरी व वसमत येथे २ उपजिल्हा रुग्णालय आणि औंढा नागनाथ, सेनगाव, आखाडा बाळापूर येथे प्रत्येकी एक असे तीन ग्रामीण रुग्णालय सध्या कार्यरत आहेत.
एप्रिल १९ ते मार्च २० या दरम्यान ग्रामीण रुग्णालय औंढा नागनाथ येथे ७९० महिलांची प्रसूती नॉर्मल झाली. महिला रुग्णालय वसमत येथे २०७९ प्रसूती करण्यात आली यामध्ये ५०५ सिझर तर १५७४ नॉर्मल करण्यात आली. जिल्हा रुग्णालय हिंगोली येथे ४९४४ प्रसूती करण्यात आली असून १३१५ सिझर तर ३६२९ नॉर्मल करण्यात आली. ग्रामीण रुग्णालय आखाडा बाळापूर येथे ५९८ महिलांची प्रसूती नॉर्मल झाली. उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी येथे ४७१ महिलांची प्रसूती नॉर्मल झाली. ग्रामीण रुग्णालय सेनगाव येथे २३६ महिलांची प्रसूती नॉर्मल झाली.
एप्रिल २० ते डिसेंबर २० या काळात ग्रामीण रुग्णालय औंढा नागनाथ येथे ५०१ महिलांची प्रसूती नॉर्मल झाली. उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे ७ महिलांची प्रसूती झाली असून यात १ सिझर तर ६ नॉर्मल झाल्या. महिला रुग्णालय वसमत येथे १२३८ महिलांची प्रसूती झाली असून ९६८ महिलांची नॉर्मल तर २७० सिझर करावे लागले. जिल्हा रुग्णालय हिंगोली येथे ३३१४ महिलांची प्रसूती करण्यात आली. यात २५८६ महिलांची नॉर्मल प्रसूती झाली तर ७२८ सिझर करावे लागले. ग्रामीण रुग्णालय आखाडा बाळापूर येथे ३५८ महिलांची प्रसूती झाली असून ३५८ महिलांची प्रसूती नॉर्मल झाली. उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी येथे ३२४ प्रसूती करण्यात आली असून ३२४ नॉर्मल प्रसूती झाली.ग्राामीण रुग्णालय सेनगाव येथे ११२ प्रसू्ती करण्यात आली तर ११२ नॉर्मल प्रसूती करण्यात आली.
प्रतिक्रिया
प्रसूतीची अपेक्षित तारीख गरोदरमातांना सांगितली जाते. बाळंतपणासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात येते. दोन्ही ठिकाणी काही अडचणी असल्यास १०८ किंवा १०२ च्या रुग्णवाहिकेने जिल्हास्तरावर त्यांना पाठविण्यात येते. कोरोना काळात सर्वच डॉक्टरांनी गरोदरमातांची काळजी घेतली आहे.
-डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. हिंगोली
२०१९
ग्रामीण रुग्णालय औंढा नागनाथ- नार्मल ७९०- सिझर००
ग्रामीण रुग्णालय सेनगाव-नॉर्मल -नॉर्मल २३६-सिझर ००
ग्रामीण रुग्णालय आखाडा बाळापूर-नॉर्मल ५९८-सिझर ००
२०२०
ग्रामीण रुग्णालय औंढा नागनाथ- नार्मल ५०१- सिझर००
ग्रामीण रुग्णालय सेनगाव-नॉर्मल -नॉर्मल ११२-सिझर ००
ग्रामीण रुग्णालय आखाडा बाळापूर-नॉर्मल ३५८-सिझर ००