शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

अवकाळी पावसामुळे ‘पूर्णे’च्या साखरेचा झाला पाक; गोडाऊनमध्ये पाणीच पाणी, २ कोटींचे नुकसान

By विजय पाटील | Updated: November 28, 2023 19:30 IST

गोडाऊनमध्ये सर्वत्र पाणीच पाणी, अवकाळी पावसामुळे कारखान्याचे गाळप थांबवावे लागले आहे.

हिंगोली : रविवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे  जिल्ह्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्यातील साखरेची पोती पाण्याखाली आली. त्यामुळे साखरेचे तब्बल दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे कारखाना प्रशासनाने सांगितले.

वसमत तालुक्यात २६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेदरम्यान अचानक जोरदार पाऊस झाला. यावेळी अवकाळी मुसळधार पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यापाठोपाठ कापूस, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, पूर्णा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. अवकाळी पावसाने साखरेच्या गोडाऊनमधील अंदाजे ५०० मे.टनाच्या जवळपास साखर भिजली आहे. पाऊस सुरू झाला तेव्हा गोडाऊनमध्ये पाणी साचेल असे वाटले नव्हते; परंतु जोराचा पाऊस असल्यामुळे गोडाऊनमध्ये पाणीच पाणी झाले. अवकाळी पावसामुळे कारखान्यात मोठे नुकसान झाले.

गाळप पूर्ववत चालू करण्यासाठी अंदाजे २४ तास लागले आहे. अवकाळी पावसामुळे कारखान्याचे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली. अवकाळी पावसामुळे कारखान्याचे गाळप थांबवावे लागले आहे. पुढील चार ते पाच दिवस कारखाना पूर्ण गाळप क्षमतेने चालविण्यास अडचण येणार आहे. ज्या गतीने ऊसतोडणी होत होती ती अवकाळी पावसामुळे ऊसतोडणी थांबली असल्याने कारखान्याचे गाळप काही दिवस थांबणार असल्याचे सांगण्यात आले. साखर ज्या गोडाऊनमध्ये ठेवली आहे त्या गोडाऊनमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे साखर पाण्यात भिजली गेली आहे.

गोडाऊनमध्ये सर्वत्र पाणीच पाणी...अवकाळी पावसामुळे कारखान्याच्या गोडाऊनमध्ये असलेली साखरेची पोती भिजली गेली. यामध्ये ५०० मेट्रिक टन साखर होती. या अवकाळी पावसामुळे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.- सुनील दळवी, कार्यकारी संचालक, ‘पूर्णा’ कारखाना

टॅग्स :RainपाऊसHingoliहिंगोलीSugar factoryसाखर कारखाने