शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या बेजवाबदारपणामुळेच घटना -धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:25 IST

गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी भीमा कोरेगावच्या प्रकरणात योग्य काळजी घेतली नाही. सरकारच्या बेजवाबदारपणामुळेच ही घटना घडली आहे. यात राजकारण करून मढ्यावरचे लोणी खाणे सरकारने बंद करावे, रामदास आठवले भाजपशी संलग्न आहेत. ते माध्यमांसमोर वेगळेच बोलत आहेत. माध्यमांपेक्षा त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी बोलून राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, याचा जाब विचारावा, असा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आठवले यांना दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी भीमा कोरेगावच्या प्रकरणात योग्य काळजी घेतली नाही. सरकारच्या बेजवाबदारपणामुळेच ही घटना घडली आहे. यात राजकारण करून मढ्यावरचे लोणी खाणे सरकारने बंद करावे, रामदास आठवले भाजपशी संलग्न आहेत. ते माध्यमांसमोर वेगळेच बोलत आहेत. माध्यमांपेक्षा त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी बोलून राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, याचा जाब विचारावा, असा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आठवले यांना दिला आहे.हिंगोली येथे राष्टÑवादी भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंढे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती नसलेल्या भाजपाच्या शाम जाजू यांनी त्यांच्या बद्दल बोलू नये, सामाजिक तेढ निर्माण करणे, महापुरूषांच्या नावाने मतभेद निर्माण करणे, जातीपातीत भांडणे लावणे हेच भाजपच्या लोकांचे मागील साडेतीन वर्षातील काम आहेत. मात्र आमच्या दैवताच्या वंशजांबद्दल असे बोलणे कदापीही खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तर यापूर्वी यवतमाळ ते नागपूर अशी दिंडी यात्रा काढल्यामुळे सरकारला कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा करणे भाग पडले. घाई-घाईत अर्धवट पैसे खात्यावर जमा करणे भाग पडले, बोंडअळी, धानावरील तुडतुडे यासाठी मदत, ओखी वादळात झालेल्या नुकसानीची भरपाई आदी प्रश्नांवर सरकारला जाग आली. त्यामुळे आता मराठवाड्यातील प्रश्नांसाठी हल्लाबोल यात्रा काढण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. हिंगोलीतील हमीभाव केंद्रावर झालेल्या गैरप्रकारावर विचारले असता उडीद, मूग, तूर आदींची रक्कम न मिळाल्याच्या ६० ते ७० हमी केंद्रातील तक्रारी असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत जाब विचारल्यानंतर केवळ परळीच्याच केंद्रावरील शेतकºयांना चुकारे मिळाले.येथील प्रकरणावर मी वरिष्ठांमार्फत अहवाल मागविणार असल्याचे त्यांनी सांगितले. १६ जानेवारीपासून तुळजापूर येथून हल्लोबोल यात्रेला प्रारंभ होणार आहे. ही यात्रा ९ दिवसांत २६ ठिकाणी सभा घेवून औरंगाबाद येथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढून ३ फेब्रुवारीला समारोप होणार आहे. या यात्रेमध्ये मराठवाड्यातील शेतकरी, व्यापारी, तरूण, महिला यांच्याकडून विविध स्थानिक प्रश्न जाणून घेतले जाणार आहेत. यावर सरकार विरूद्ध वज्रमूठ आवळली जाणार असल्याचे ते म्हणाले.हिंगोली जिल्ह्यात २२ जानेवारी रोजी दोन ठिकाणी सभा घेतल्या जाणार आहेत. या पत्रकार परिषदेस आ. रामराव वडकुते, माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, बसवराज पाटील, सोनाली देशमुख, दिलीपराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, जगजीतराज खुराणा आदींची उपस्थिती होती.