सरकारच्या बेजवाबदारपणामुळेच घटना -धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:25 IST2018-01-07T23:25:09+5:302018-01-07T23:25:16+5:30
गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी भीमा कोरेगावच्या प्रकरणात योग्य काळजी घेतली नाही. सरकारच्या बेजवाबदारपणामुळेच ही घटना घडली आहे. यात राजकारण करून मढ्यावरचे लोणी खाणे सरकारने बंद करावे, रामदास आठवले भाजपशी संलग्न आहेत. ते माध्यमांसमोर वेगळेच बोलत आहेत. माध्यमांपेक्षा त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी बोलून राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, याचा जाब विचारावा, असा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आठवले यांना दिला आहे.

सरकारच्या बेजवाबदारपणामुळेच घटना -धनंजय मुंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी भीमा कोरेगावच्या प्रकरणात योग्य काळजी घेतली नाही. सरकारच्या बेजवाबदारपणामुळेच ही घटना घडली आहे. यात राजकारण करून मढ्यावरचे लोणी खाणे सरकारने बंद करावे, रामदास आठवले भाजपशी संलग्न आहेत. ते माध्यमांसमोर वेगळेच बोलत आहेत. माध्यमांपेक्षा त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी बोलून राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, याचा जाब विचारावा, असा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आठवले यांना दिला आहे.
हिंगोली येथे राष्टÑवादी भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंढे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती नसलेल्या भाजपाच्या शाम जाजू यांनी त्यांच्या बद्दल बोलू नये, सामाजिक तेढ निर्माण करणे, महापुरूषांच्या नावाने मतभेद निर्माण करणे, जातीपातीत भांडणे लावणे हेच भाजपच्या लोकांचे मागील साडेतीन वर्षातील काम आहेत. मात्र आमच्या दैवताच्या वंशजांबद्दल असे बोलणे कदापीही खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तर यापूर्वी यवतमाळ ते नागपूर अशी दिंडी यात्रा काढल्यामुळे सरकारला कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा करणे भाग पडले. घाई-घाईत अर्धवट पैसे खात्यावर जमा करणे भाग पडले, बोंडअळी, धानावरील तुडतुडे यासाठी मदत, ओखी वादळात झालेल्या नुकसानीची भरपाई आदी प्रश्नांवर सरकारला जाग आली. त्यामुळे आता मराठवाड्यातील प्रश्नांसाठी हल्लाबोल यात्रा काढण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. हिंगोलीतील हमीभाव केंद्रावर झालेल्या गैरप्रकारावर विचारले असता उडीद, मूग, तूर आदींची रक्कम न मिळाल्याच्या ६० ते ७० हमी केंद्रातील तक्रारी असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत जाब विचारल्यानंतर केवळ परळीच्याच केंद्रावरील शेतकºयांना चुकारे मिळाले.
येथील प्रकरणावर मी वरिष्ठांमार्फत अहवाल मागविणार असल्याचे त्यांनी सांगितले. १६ जानेवारीपासून तुळजापूर येथून हल्लोबोल यात्रेला प्रारंभ होणार आहे. ही यात्रा ९ दिवसांत २६ ठिकाणी सभा घेवून औरंगाबाद येथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढून ३ फेब्रुवारीला समारोप होणार आहे. या यात्रेमध्ये मराठवाड्यातील शेतकरी, व्यापारी, तरूण, महिला यांच्याकडून विविध स्थानिक प्रश्न जाणून घेतले जाणार आहेत. यावर सरकार विरूद्ध वज्रमूठ आवळली जाणार असल्याचे ते म्हणाले.
हिंगोली जिल्ह्यात २२ जानेवारी रोजी दोन ठिकाणी सभा घेतल्या जाणार आहेत. या पत्रकार परिषदेस आ. रामराव वडकुते, माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, बसवराज पाटील, सोनाली देशमुख, दिलीपराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, जगजीतराज खुराणा आदींची उपस्थिती होती.