शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

खड्ड्यात गाडी अडकून फेकल्या गेल्याने एकाचा जागीच मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 3:54 PM

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव - कनेरगाव नाका मार्गे जाणा-या रस्ताची रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी अवस्था झाली आहे.

ठळक मुद्देकनेरगाव - गोरेगाव रस्त्यावर पुन्हा एकाचा अपघाती मृत्यू रस्ता व गावालगतच्या पुलाच वर्षानुवर्षाचे भिजत घोंगडे  

हिंगोली  : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव - कनेरगाव नाका मार्गे जाणा-या रस्ताची रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी अवस्था झाली आहे. प्रचंड प्रमाणात उखडलेल्या या रस्त्यावर काल रात्री अपघातात एकाच मृत्यू  झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. 

विकास दत्तात्रय पंडितकर (३४, रा. गोरेगाव) असे मृताचे नाव आहे. ते सेनगाव येथे ग्राम पंचायत कार्यालयात गट समन्वयक म्हणून कार्यरत होते. काल रात्री ते गोरेगाव - कनेरगाव या मार्गावरून दुचाकीवर प्रवास करत होते. रस्त्यावर वागदरा येथे आले असता रस्त्यावरील एका खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळली. आदला खूप जोरात बसल्याने विकास रस्त्याच्या कडेला फेकले गेले. फेकले गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली व यातच त्यांचा मृत्यू झाला. विकास हे मागील आठवड्यातच वडील झाले होते व त्यांनी आपल्या बालकाचा चेहरा सुद्धा पाहिला नव्हता. यामुळे संपूर्ण परिसरात नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. 

रस्त्याच्या कडेला अंधार असल्याने तिकडे रात्री येणा-या जाणा-यांचे लक्ष गेले नाही. त्यांच्या दुचाकीच्या एका बाजूचा लाईट सुरु होता. मात्र, अशात काही शेतकरी रबी पिकला रात्री पाणी देण्यासाठी शेतात येतात यामुळे गाडी पाहणा-याला गाडी एखाद्या शेतक-याने घाईत अशी लावली असेल असे वाटले. हा रस्ता वर्षानुवर्ष खराब आहे एका वर्षापूर्वीही याच ठिकाणी झालेल्या अपघात एकाचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एक अपघाती मृत्यू याच ठिकाणी झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

दुरुस्तीसाठी ग्रामस्थ आक्रमक रस्ता व पुलाची दुरुस्ती करण्यासाठी आजवर ग्रामस्थांना आजवर केवळ आश्वासनेच मिळाली आहेत. तसेच या मार्गावर पोलिसांची गस्त सुद्धा नाही यामुळेच विकास यांच्या अपघाताची माहिती दुस-या दिवशी मिळाली यामुळेही ग्रामस्थ संतप्त आहेत. दुरुस्ती  प्रकरणी आ. तान्हाजी मुटकूळे यांनासुद्धा ग्रामस्थांनी  साकडे घातले तरीही रस्ता जशास तसा आहे. यामुळे आता दुरुस्ती साठी आणखी किती जणांचा बळी जावा लागेल असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातHingoliहिंगोली