लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात पुन्हा एकदा वाळू वाहतूक बंद झाल्याने बांधकामे ठप्प पडत असल्याचे चित्र आहे. शासकीय कामांनाही याचा फटका बसत असून कंत्राटदार वाळू लागणारी कामेच घेत नसल्याचे चित्र आहे. खाजगी बांधकामे तर ठप्पच आहेत.जिल्ह्याशेजारील काही वाळू घाट लिलावात गेल्याने काही दिवसांपूर्वी वाळू वाहतूक सुरू झाली होती. त्यामुळे अनेक शासकीय व खाजगी बांधकामे सुरू झाली होती. मात्र तपासणीसाठी हे घाट बंद पडल्याने पुन्हा एकदा वाळू टंचाईचा सामना करावा लागत आहे. परजिल्ह्यातून येणारी वाळूही कडक तपासण्यांच्या पार्श्वभूमिवर येणेच बंद झाले. त्यामुळे कंत्राटदारांवर कामे बंद करण्याची वेळ येत आहे. पावसाळा जवळ येत असल्याने घाई करणाऱ्या कंत्राटदारांना या समस्येमुळे वाळू न मिळाल्यास कामे थांबवावी लागणार आहेत.
वाळूअभावी पुन्हा कामे पडू लागली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:00 IST