दुचाकीच्या धडकेत चालकाचा मृत्यू तर घोडा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:22 AM2021-06-01T04:22:44+5:302021-06-01T04:22:44+5:30

हिगोली : बैलगाडीला बांधलेल्या घोड्याला दुचाकीची धडक बसून दुचाकीस्वार ठार तर घोडा जखमी झाल्याची घटना ३१ मे रोजी सकाळी ...

The driver was killed and the horse was injured in the collision | दुचाकीच्या धडकेत चालकाचा मृत्यू तर घोडा जखमी

दुचाकीच्या धडकेत चालकाचा मृत्यू तर घोडा जखमी

Next

हिगोली : बैलगाडीला बांधलेल्या घोड्याला दुचाकीची धडक बसून दुचाकीस्वार ठार तर घोडा जखमी झाल्याची घटना ३१ मे रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास नर्सी रोडवरील बुलडाणा अर्बंन बँकेच्या गोदामाजवळ घडली.

हिंगोली शहरातील मंगळवारा भागातील शैख मैनोद्दीन शेख युसूफ हे बैलगाडीला पाठीमागे घोडा बांधून शेताकडे निघाले होते. यावेळी आकाश मुरलीधर जावळे (रा. राहुली बु.) हे लक्ष्मण मानेकर यांच्यासह एमएच ३८ एए ३९२६ क्रमांकाच्या दुचाकीने नर्सी नामदेवकडून हिंगोलीकडे निघाले होते. त्यांची दुचाकी नर्सी रोडवरील बुलडाणा अर्बन बँकेच्या गोदामाजवळ आली असता त्यांच्या दुचाकीची धडक घोड्याला बसली. या धडकेत आकाश जावळे यांचा मृत्यू झाला तर घोड्यासह दुचाकीवर पाठीमागे बसलेले लक्ष्मण मानेकर हे जखमी झाले तसेच दुचाकीचे ५ हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी शेख मैनोद्दीन शेख युसूफ यांच्या फिर्यादीवरून मृत आकाश जावळे यांच्याविरुद्ध वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालविल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सपोनि. बळिराम बंदखडके, पोउपनि गोहाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपास पोउपनि. गोहाडे करत आहेत.

Web Title: The driver was killed and the horse was injured in the collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.