६ हजार लाभार्थ्याच्या घरकुलांचे स्वप्न पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:27 IST2021-01-22T04:27:16+5:302021-01-22T04:27:16+5:30
पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण अंतर्गत २०१६-१७ ते २०२०-२१ पर्यत ११ हजार ३३५ एवढे उद्दिष्ट होते. पैकी ६ हजार १८८ ...

६ हजार लाभार्थ्याच्या घरकुलांचे स्वप्न पूर्ण
पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण अंतर्गत २०१६-१७ ते २०२०-२१ पर्यत ११ हजार ३३५ एवढे उद्दिष्ट होते. पैकी ६ हजार १८८ घरकुले पूर्ण केली आहेत. ‘सर्वांसाठी घरे-२०२२’ हे केंद्र शासनाचे धोरण असून राज्य शासनाने देखील या धोरणांचा स्वीकार केला आहे. या अनुषंगाने राज्यात राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृह निर्माण कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदीम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशा विविध ग्रामीण गृहनिर्माण योजना राबविण्यात येत आहेत. त्यांना पूरक पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, अतिक्रमण नियमानुकूल करण्याची योजना अशा योजनांनाही राबविण्यात येत आहेत.
पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण योजना संपूर्ण देशात २० नोव्हेंबर २० ते २८ फेब्रुवारी २१ दरम्यान राबविण्यात येत आहे.
राज्य पुरस्कृत योजना रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजोतंर्गत २०१६-१७ ते २०२०-२१ पर्यत जिल्ह्याला मिळालेले उद्दिष्ट ९ हजार ७४५ एवढे आहे. उद्दिष्टांपैकी ६ हजार ४६६ घरे पूर्ण झाली आहेत. सध्या सुरु असलेल्या अभियाना काळात ४२१ घरे पूर्ण झाली आहेत.
वसमत तालुक्यात २५७८ घरांचे उद्दिष्ट असून १३१४ पूर्ण, औंढानागनाथ तालुक्यात १७८६ घरांचे उद्दिष्ट असून ९८३ पूर्ण, सेनगाव तालुक्यात २८०५ उद्दिष्ट असून १३७२ पूर्ण, कळमनुरी २८५० घरांचे उद्दिष्ट असून १६५६ पूर्ण तर हिंगोली तालुक्यात ७३१८ घरांचे उद्दिष्ट असून ६१८८ घरकुलांचे काम पूर्ण झाली आहेत.
दुसरा हप्ता प्रलंबित
पहिला हप्ता मिळून बारा महिने पूर्ण झाली होऊनही आजपर्यत ४२७ लाभार्थिनी घरकुले पूर्ण केले नाही. त्यामुळे लाभार्थिना दुसरा हप्ता देण्यात आलेला नाही. या लाभार्थ्याना पंचायत समितीस्तरावर गटविकास अधिकारी यांच्या मार्फत अनेक वेळा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत.काही लाभार्थ्यांना वारंवार कळविले आहे. तरीही त्यांनी घराचा पायाही पूर्ण केलेला दिसून येत नाही.