सिरसम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:28 IST2021-03-28T04:28:09+5:302021-03-28T04:28:09+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० व्या जयंतीनिमित्त सिरसम येथे २३ मार्च बुधवार रोजी जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अरुण ...

Dr. at Sirsam. Babasaheb Ambedkar Jayanti Executive Committee announced | सिरसम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यकारिणी जाहीर

सिरसम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यकारिणी जाहीर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० व्या जयंतीनिमित्त सिरसम येथे २३ मार्च बुधवार रोजी जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अरुण कांबळे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सुनील पठाडे, सचिवपदी भास्कर खंदारे, समाधान पठाडे, संघटक सिद्धार्थ कांबळे, कोषाध्यक्ष मुकिंदा पाईकराव आदींची निवड करण्यात आली. कोरोना नियमाचे पालन करून १४ एप्रिल रोजी जयंती उत्सव सामाजिक प्रबोधन कार्यक्रम, पंचशील ध्वजारोहण, धम्म विधी करून जयंती साजरी करण्याचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने, सामाजिक सलोखा राखत जयंती साजरी करण्यात येणार आहे.

यावेळी गावातील विनोद कांबळे, आकाश पठाडे, जीवन पठाडे, वैभव कांबळे, विक्रम पठाडे, गणेश पठाडे, प्रभू येडे, सुनील कांबळे, उत्तम पाईकराव, संतोष पठाडे, अनिल पठाडे, निलेश पठाडे, सुनील कांबळे, माधव कांबळे आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Web Title: Dr. at Sirsam. Babasaheb Ambedkar Jayanti Executive Committee announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.