डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अनावरण १४ एप्रिलपर्यंत होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:56 IST2021-02-05T07:56:46+5:302021-02-05T07:56:46+5:30
वसमत : येथे आसेगाव टी पॉइंटवर उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अनावरण १४ एप्रिलपर्यंत होणार
वसमत : येथे आसेगाव टी पॉइंटवर उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी एक लाख रुपयांचा निधी पुतळा समितीकडे सुपूर्त केला. तसेच १४ एप्रिलपर्यंत पुतळा उभा राहील या दृष्टीने पुतळा समिती काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकवर्गणीतून होणाऱ्या पुतळ्यासाठी सर्व स्तरातील समाजबांधवांनी हातभार लावावा, असे आवाहन पुतळा समितीचे अध्यक्ष दांडेगावकर यांनी केले.
वसमत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच असेगाव टी पॉइंटजवळ अभ्यासिकेची उभारणी होणार आहे. त्यासाठी लोकवर्गणी जमा करण्याचे काम सुरू आहे. याप्रसंगी माजी मंत्री दांडेगावकर म्हणाले की, वसमत तालुक्याच्या वैभवात भर घालणारा हा पुतळा होणार आहे. पुतळा समिती या कामासाठी परिश्रम घेत असून, १४ एप्रिलपर्यंत पुतळा उभारण्याचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी माजी आ. मुंजाजीराव जाधव, माजी आ. पंडितराव देशमुख, ॲड. रामचंद्र बागल, यशवंतराव उबारे, गौतम मोगले, राजकुमार येंगडे, माजी मुख्याध्यापक बी. एस. खिल्लारे, प्रा. सुभाष मस्के, एस. पी. मुळे, ॲड. चिंतामण देशमुख आदीं मान्यवर उपस्थित होते.