शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

वसमतमध्ये गाढव मोर्चाने वेधले लक्ष; घरकुल योजनेसाठी आक्रमक आंदोलन

By विजय पाटील | Updated: August 14, 2023 16:46 IST

वसमत शहरासह ग्रामीण भागातील गरजू लाभार्थ्यांना रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेचे लाभ मिळत नाही.

- इस्माईल जाहगिरदारवसमत (जि. हिंगोली): पंचायत समिती व नगरपालिका प्रशासनाने गरजू लाभार्थ्यांना डावलून धनदांडग्यांना घरकुल योजनेचा लाभ देत भ्रष्ट्राचार केला,गरजुंचे नावे घरकुल योजनेत समाविष्ट करणे आदी मागण्यांसाठी भीमशक्तीच्यावतीने सोमवारी गाढव मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला होता. भीमशक्ती व काँग्रेसच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले.

वसमत शहरासह ग्रामीण भागातील गरजू लाभार्थ्यांना रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेचे लाभ मिळत नाही. गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांच्यामुळे धनदांडग्यांना लाभ मिळाल्याचे दिसून येत आहे. त्वरित रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेत नव्याने नावे समाविष्ट करुन लाभार्थ्यांना घरकुल देणे, बोरी सावंत, भोगाव, करंजी, हट्टा, कळंबा,

बळेगाव येथील गरजुंचे रमाई आवास योजनेत नव्याने नावे समाविष्ट करण्यात यावी, नगरपालिके अंतर्गत येणारे नसरतपुर, सीराज कॉलनी या भागातील गरजुंचे नावे रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजना यात समाविष्ट करणे, बोरी सावंत येथे दलित वस्तीचा निधी इतरत्र खर्च केला याची चौकशी करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी १४ ऑगस्ट रोजी भीमशक्तीच्या वतीने गाढव मोर्चा काढण्यात आला.

गाढवांच्या पाठीवर लावले बोर्ड...१४ ऑगस्ट रोजी काढलेल्या मोर्चात दोन गाढव होते. गाढवांच्या पाठीवर नगरपालिका व पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचे पद नाम लिखित फलक लावून शहरातील विविध मार्गाने मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयवर धडकला. या मोर्चास काँग्रेस पक्षाने पाठींबा दिला. विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांना देण्यात आले. निवेदनावर काँग्रेसच्या प्रिती जयस्वाल, राजाराम खराटे, पुष्पक देशमुख, भीमशक्तीचे प्रमोद कुलदिपके, काशिनाथ गायकवाड, सागर दिपके, भीमा कांबळे, राहुल घोडके, गौतम खंदारे यांच्या सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :Hingoliहिंगोलीagitationआंदोलन