डोंगरकडा - जवळा पांचाळ रस्त्याची दुरुस्ती नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:21 IST2020-12-27T04:21:43+5:302020-12-27T04:21:43+5:30
डोंगरकडा फाटा ते जवळा पांचाळदरम्यान ७ कि.मी.चा रस्ता आहे. हा रस्ता खराब झाल्याने ये- जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसाेय हाेत ...

डोंगरकडा - जवळा पांचाळ रस्त्याची दुरुस्ती नावालाच
डोंगरकडा फाटा ते जवळा पांचाळदरम्यान ७ कि.मी.चा रस्ता आहे. हा रस्ता खराब झाल्याने ये- जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसाेय हाेत आहे. एकाच बाजूने रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे अपघात हाेत असत. तसेच या रस्त्यावर वर्दळ असते. त्याअनुषंगाने लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित केले होते. सहा दिवसांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. परंतु, ही दुरुस्ती नावालाच हाेत असल्याचे वाहनधारकांतून बोलल्या जात आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असताना डांबराचा वापर कमी होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे खड्ड्यात केवळ गिट्टी टाकण्याचे काम करण्यात येत आहे. यामुळे काही दिवसांत या रस्त्यावरील खड्डे पुन्हा उघडे पडत आहेत. यामुळे थातूरमातूर पध्दतीने केलेला रस्ता किती दिवस टिकेल, असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे. फाेटाे नं ०४