आडगाव रंजे येथे शिवस्वराज्य पॅनलचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:30 IST2021-01-20T04:30:06+5:302021-01-20T04:30:06+5:30

आडगाव रंजे ग्रामपंचायतच्या ११ जागांसाठी तिरंगी लढत झाली. या लढतीत शिवसेनेच्या शिवस्वराज्य पॅनल तर राष्ट्रवादीचे माजी सरपंच बाळासाहेब चव्हाण ...

Dominance of Shivswarajya panel at Adgaon Ranje | आडगाव रंजे येथे शिवस्वराज्य पॅनलचे वर्चस्व

आडगाव रंजे येथे शिवस्वराज्य पॅनलचे वर्चस्व

आडगाव रंजे ग्रामपंचायतच्या ११ जागांसाठी तिरंगी लढत झाली. या लढतीत शिवसेनेच्या शिवस्वराज्य पॅनल तर राष्ट्रवादीचे माजी सरपंच बाळासाहेब चव्हाण तर देवकृपा पॅनलचे विद्यमान सरपंच नारायण चव्हाण यांच्या वतीने ओंकारेश्वर पॅनल यांच्यामध्ये लढत झाली होती. या लढतीत शिवस्वराज्य पॅनलला अकरापैकी ८ जागा मिळाल्या आहेत. त्यामध्ये वाॅर्ड क्रमांक एकमध्ये किरण खंदारे, छाया किसन चव्हाण, त्रिंबक रामाआप्पा सोळंके, वार्ड क्रमांक दोनमध्ये ऊर्मिला मुंजा वीर, वाॅर्ड क्रमांक तीनमध्ये लता राधेश्याम जयस्वाल, तर वाॅर्ड क्रमांक चारमध्ये विजया दिलीप चव्हाण, शीतल आनंदा चव्हाण, एकनाथ भीमराव चव्हाण हे विजयी झाले. देवकृपा पॅनलचे वाॅर्ड क्रमांक दोनमध्ये कुंडलिक लक्ष्मण चव्हाण, मायादेवी प्रताप चव्हाण, तर वाॅर्ड क्रमांक तीनमधून माजी सरपंच बाळासाहेब चव्हाण विजयी झाले. या निवडणुकीत विद्यमान सरपंच व उपसरपंच यांचा पराभव झाला आहे.

Web Title: Dominance of Shivswarajya panel at Adgaon Ranje