शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पोटाची भूक अर्धी ठेवून ज्ञानाची भूक भागवत ऊसतोड कामगाराची मुलगी होणार डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 13:58 IST

विटा रचलेली रूम केली; दोन मैत्रिणीत मेसचा एकच डबा लावला

ठळक मुद्देकळमनुरी तालुक्यातील जिद्दी कहाणी परिस्थिती बदलायची हा निर्धार करून मी अभ्यास करत राहिले.

- रमेश कदम 

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : परिस्थितीला शरण न जाता तिच्याशी दोन हात करीत अखंड परिश्रम घेतले. दोन मैत्रिणीत मेसचा एकच डबा लावला. पोटाची भूक अर्धी ठेवून ज्ञानाची भूक पूर्ण केली. या मेहनतीमुळे नीट परीक्षेत चांगले गुण घेऊन एका ऊसतोड कामगाराच्या मुलीने एमबीबीएसचा प्रवेश निश्चित केला आहे.

कळमनुरी तालुक्यातील भुरक्याची वाडी या लहानशा खेड्यातील आशाताई बाबूराव भुरके या मुलीच्या जिद्दीची ही कहाणी. भुरक्याची वाडी हे डोंगराच्या कुशीत बसलेले आदिवासी गाव. गावातील ८० टक्के नागरिक दरवर्षी उसतोड कामगार म्हणून भटकंतीवर असतात. त्यामुळे स्थैर्य आणि मुलांचे शिक्षण यावर पालकांचे लक्ष नसते. गावातील अनेकांना हळूहळू शिक्षणाचे महत्त्व पटू लागले आहे. बाबूराव भुरके यांनाही हे उमगले. तीन मुलांवर शेंडेफळ असलेली आशाताई हिच्यावर प्रचंड जीव. शिवाय तीही कायम बुद्धीची चुणूक दाखवत आली. त्यामुळे ती डॉक्टर व्हावी, ही तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते कष्ट करीत राहिले. शिक्षणाला पैसा लागू लागल्याने त्यांनी बैल विकला. तिला अकरावी, बारावीच्या शिक्षणासाठी नांदेडला ठेवले. खर्च खूप लागत होता. पित्याची, कुटूंबियांची ही कुतरओढ तिला जाणवत होती.

नांदेडला कॉलेजात तासिका होत नव्हत्या. शिकवणीशिवाय पर्याय नव्हता. क्लासेसच्या शिक्षकांना अर्ज, विनंत्या केल्या. परिस्थितीची जाणीव करून दिली. काहीअंशी फिसमधून सुट मिळविली. आपल्यासारखीच गरजवंत मैत्रीण गाठली. खोलीचे भाडे परवडत नव्हते. विटा रचलेली साधी खोली केली. दोघी मैत्रिणीत मेसचा एकच डबा लावला. एकच डबा दोघींनी दोन वर्षे खाल्ला. सोयी-सुविधा नसतानाही कठोर परिश्रम करून अभ्यास मात्र नियमितपणे केला आणि नीट परीक्षेत २३४ गुण मिळविले. आज ती एमबीबीएससाठी पात्र झाली आहे. धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात तिचा प्रवेश निश्चित झाला आहे. तिच्या जिद्द आणि कठोर परिश्रमाने परिस्थितीलाही नमविले आहे.  

आई वडिलांचे परिश्रम प्रेरणा देत राहिलेआई-वडील अपार कष्ट करत होते. घामाने निथळतांना त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी मोठी स्वप्ने होती. त्यांची स्वप्न पूर्ण करून परिस्थिती बदलायची हा निर्धार करून मी अभ्यास करत राहिले. कुटुंबियांचे परिश्रम मात्र मला प्रेरणा देत राहिले. त्यामुळेच आज स्वप्नपूर्तीकडे माझे पहिले पाऊल पडत आहे.- आशाताई भुरके

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीMedicalवैद्यकीयSugar factoryसाखर कारखानेHingoliहिंगोली