विवाहितेचा छळ करून तीन वेळा दिला तलाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:29 IST2021-09-03T04:29:57+5:302021-09-03T04:29:57+5:30

समरीन बेगम सय्यद शहेजाद हुसैन (रा. महानपुरा, डिग्रस जि. यवतमाळ ह.मु. आजम कॉलनी हिंगोली) असे पीडित महिलेचे नाव आहे. ...

Divorced three times by harassing a married woman | विवाहितेचा छळ करून तीन वेळा दिला तलाक

विवाहितेचा छळ करून तीन वेळा दिला तलाक

समरीन बेगम सय्यद शहेजाद हुसैन (रा. महानपुरा, डिग्रस जि. यवतमाळ ह.मु. आजम कॉलनी हिंगोली) असे पीडित महिलेचे नाव आहे. ऑगस्ट २००५ ते १९ जुलै २०२१ या काळात सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. तुझ्या वडिलांनी मनासारखा हुंडा दिला नाही, असे म्हणून सासूच्या सांगण्यावरून पतीने छळ केला. तसेच माहेरी येऊन पीडित महिला व तिच्या वडिलास मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देत तीन वेळेस तलाक दिला. याप्रकरणी समरीन बेगम सय्यद शहेजाद हुसैन यांच्या फिर्यादीवरून सय्यद शहेजाद हुसैन सय्यद मुर्तुजा हुसैन (पती), खुर्शीद बानू सय्यद मुर्तुजा (दोघे रा. महानपुरा, डिग्रस) याच्याविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत.

Web Title: Divorced three times by harassing a married woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.