Divisional Commissioner overwhelmed by works in Dategaon! | दाटेगावातील कामांनी विभागीय आयुक्त भारावले!

दाटेगावातील कामांनी विभागीय आयुक्त भारावले!

यानंतर केंद्रेकर यांनी रामलीला मैदानाच्या सपाटीकरण व संरक्षक भिंतीची पाहणी केली. या ठिकाणी आणखी काही विकासकामे करून स्वच्छतागृह, वृक्ष लागवडीची सूचना दिली, तसेच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे याबद्दल कौतुकही केले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये रुग्णांनाही सोयी-सुविधांबाबत विचारणा केली. रुग्णांनी काही अडचण नसल्याचे सांगितले. उपविभागीय अधिकारी कार्यालयातही पाहणी केली, तसेच क्रीडा आयुक्त असताना केंद्रेकर यांनी मंजूर केलेल्या बहूद्देशीय बंदिस्त क्रीडा हॉलचीही पाहणी केली. या ठिकाणी लाकडी फ्लोरिंगचे काम सुरू असल्याने विविध सूचना दिल्या.

हिंगोली तालुक्यातील दाटेगाव येथेही त्यांनी भेट दिली. या गावात मागील दोन वर्षांपासून विविध विकासकामे लोकसहभागातून ग्रामस्थांनी उभारली आहेत. काही कामे मग्रारोहयोतून केली आहेत. या ठिकाणी स्मशानभूमी, शाळा, अंगणवाडीसह इतर कामे पाहून केंद्रेकर यांनी कौतुक केले. त्यानंतर डिग्रस कऱ्हाळे येथील अंगणवाडीचीही पाहणी केली. एका सिंचन विहिरीचीही पाहणी केली. औंढा नागनाथ येथे बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या नयना पाटील यांच्या पुढाकाराने या कार्यालयाचा कायापालट झाल्याने त्यांचेही कौतुक केले.

या दौऱ्यात त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासह मुकाअ आर.बी. शर्मा, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, धनवंत माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.

कोरोना वाढू नये म्हणून जनतेनेच काळजी घ्यावी

कोरोना वाढू नये, यासाठी प्रशासन विविध उपाय करते; मात्र जनतेनेच काळजी घेतली तर रुग्णसंख्या वाढणार नाही. वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. शासकीय यंत्रणा चांगले काम करीत आहे. संचारबंदीची वेळ येऊ नये, यासाठी जनतेने जास्त दक्ष राहण्याचे आवाहन केंद्रेकर यांनी केले.

Web Title: Divisional Commissioner overwhelmed by works in Dategaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.