घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्यांचे वितरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:36 IST2021-09-09T04:36:30+5:302021-09-09T04:36:30+5:30
हिंगोली : सध्या शाळा सुरू नसल्यामुळे जंतनाशक गोळ्यांचे वितरण आशावर्कर, अंगणवाडी, तसेच आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रत्येक घरी भेटी ...

घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्यांचे वितरण करा
हिंगोली : सध्या शाळा सुरू नसल्यामुळे जंतनाशक गोळ्यांचे वितरण आशावर्कर, अंगणवाडी, तसेच आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रत्येक घरी भेटी देऊन वाटप कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हाधिकारी पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टास्क फोर्स समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीस जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, शिक्षणाधिकारी परशुराम पावसे, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, समाजकल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे उपस्थित होते.
- बालकांचे जीवनमान उंचावण्यासाठी
१ - राष्ट्रीय जंतनाशक दिन २१ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येताे. यादरम्यान, मुलांचे आरोग्य, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी बालकांना घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्याचे वितरण करून सार्वजनिक ठिकाणी हात धुण्याची मोहीम राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी पापळकर यांनी केल्या.
२ - मुला-मुलींची काळजी घ्यावी...
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जगात २८ टक्के बालकांना जंत दोष असतो. ६८ टक्के बालकांमध्ये आतड्याचा जंत दोष मातीतून प्रसार होणाऱ्या जंतूंमुळे होतो. त्यामुळे १ ते १९ वर्षे या वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.