सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी झाली चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:56 IST2021-02-05T07:56:09+5:302021-02-05T07:56:09+5:30

मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत सेवानिवृत्त विस्तार अधिकारी पी. के. टाले यांना २४ ...

Discussions were held to resolve the issues of retired teachers and staff | सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी झाली चर्चा

सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी झाली चर्चा

मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत सेवानिवृत्त विस्तार अधिकारी पी. के. टाले यांना २४ वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतरची निवडश्रेणी मान्य करणे, सेवानिवृत्त दिगंबर जळबाजी बोंढारे यांना निवडश्रेणी मान्य करण्यासाठी शिक्षणाधिकारी यांच्याकडून माहिती मागविण्याचे मान्य करून घेण्यात आले. मारोतराव विठ्ठलराव पाटील यांची निवडश्रेणी मान्य करणे, सेवानिवृत्तांचे दरमहा निवृत्तिवेतन १ तारखेला होण्यासाठीचे बजेट दरमहा २० तारखेला पंचायत समितीस्तरावर पाठविण्याबाबत मान्य करून घेण्यात आले. वरिष्ठ निवडश्रेणी मान्य झाल्यानंतर थकबाकीची रक्कम माध्यमिक शिक्षकांना १ मे १९९५ पासून देण्यात येते व प्राथमिक शिक्षकांना १ एप्रिल २००४ पासून देण्यात येते. यामध्ये विसंगती आहे. शासनस्तरावर मार्गदर्शन मागविण्याचे यावेळी मान्य करण्यात आले. एकूण १२ केंद्रप्रमुखांचे वेतन नियम ११ (१) ‘अ’प्रमाणे केलेल्या वेतन निश्चितीची वेतन पडताळणी करून देण्याचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी चर्चेदरम्यान मान्य केले. प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरणे त्वरित काढणे, सेवानिवृत्तीवेळी उपदान रक्कम वितरित करणे तसेच वैद्यकीय प्रतीपूर्ती देयके निकाली काढण्यावरही यावेळी चर्चा करून ते मान्य करून घेण्यात आले. यावेळी चर्चेदरम्यान शिक्षण सभापती संजय देशमुख, मारोतराव पाटील, बी. डी. वायकुळे हे उपस्थित होते.

Web Title: Discussions were held to resolve the issues of retired teachers and staff