भाजपच्या बैठकीनिमित्त जिल्हाध्यक्षांच्या अनुपस्थितीची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:20 IST2021-06-21T04:20:37+5:302021-06-21T04:20:37+5:30
हिंगोली जिल्हाध्यक्षपदाची माळ जाधव यांच्या गळ्यात पडणार हे कळाल्यानंतर निवडीवेळी हिंगोलीकडील बरीच मंडळी नाराज होती. मात्र पक्षश्रेष्ठींकडे वजन वापरून ...

भाजपच्या बैठकीनिमित्त जिल्हाध्यक्षांच्या अनुपस्थितीची चर्चा
हिंगोली जिल्हाध्यक्षपदाची माळ जाधव यांच्या गळ्यात पडणार हे कळाल्यानंतर निवडीवेळी हिंगोलीकडील बरीच मंडळी नाराज होती. मात्र पक्षश्रेष्ठींकडे वजन वापरून जाधव यांनी बाजी मारली होती. त्यानंतर पक्षाच्या बैठकांमध्ये वारंवार त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा घडवून आणली जाते. कोरोनामुळे मध्यंतरी प्रवासाच्या अडचणीमुळे जाधव यांची अनुपस्थिती रास्त मानली जायची. आज पुन्हा ते गैरहजर असल्याने अनेकांनी माध्यमांकडे फोन करून याकडे लक्ष वेधले. या मुद्द्यावर चर्चा घडवून आणली जात आहे. याबाबत जाधव यांनी मात्र कुणीही काहीही म्हटले तरीही मी वैयक्तिक अडचणींची माहिती देत पूर्वपरवानगीनेच गैरहजर होतो, असे सांगितले.
मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे यांच्या उपस्थितीत आज बैठक झाली. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आ. गजानन घुगे , मा.आ. रामराव वडकुते, सरचिटणिस मिलिंद यंबल, फुलाजी शिंदे, डॉ. जयदीप देशमुख, वसंतराव देशमुख, शहराध्यक्ष प्रशांत सोनी, कृष्णा रुहाटिया, हमिद प्यारेवाले, यशोदाताई कोरडे, संदीप वाकडे, पप्पू चव्हाण, शंकर बोरुडे, हिम्मत राठौड, दत्तराव दंडे, पाटील, ढोके आदी उपस्थित होते. योग दिन व इतर कार्यक्रमासह पक्षीय बाबींवर यामध्ये चर्चा झाली. आगामी काळाची रणनीती ठरविण्यात आली.