शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

'तो मरेल असे वाटले नव्हते'; दारू पिण्यास मज्जाव केल्याने पित्याने रागाच्या भरात मुलास संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 19:12 IST

मुलगा दारू पिण्यास मज्जाव करत असल्याने वादातून त्याचा खून केल्याची कबुली बापाने दिली. 

कळमनुरी (हिंगोली ):  तालुक्यातील गौळ बाजार येथील शेतशिवारात 21 मे रोजीच्या मध्यरात्री एका 20 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा खून झाल्याची घटना घडली होती. या खुनाचा उलगडा झाला असून जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलाचा खून केल्याचे पुढे आले आहे. 

तालुक्यातील गौळबाजार येथे देवानंद संतोष मुधोळ याचा खून केल्याची घटना २१ मे रोजी उघडकीस आली होती. मृताचा भाऊ शिवम मुधोळ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोनी सुनील निकाळजे यांनी भेट देत अधिक तपासाच्या दृष्टीकोनातून सूचना केल्या. वरिष्ठांच्या मार्गदर्शनातून कसून तपासानंतर सपोनि श्रीनिवास रोयलावार, फौजदार के एस सोनूले, जमादार भारत घ्यार यांनी खुनाचा उलगडा करत मृताच्या बापाला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केल्या असता मुलगा दारू पिण्यास मज्जाव करत असल्याने वादातून त्याचा खून केल्याची कबुली बापाने दिली. 

दारू पिण्यास मज्जाव केल्याने होत वाददेवानंद हा मागील दोन वर्षापासून चांगल्या प्रकारे शेती करून उत्पन्न मिळवित होता. वडील संतोष मुधोळ यास दारूचे व्यसन होते. यावरून दोघांमध्ये सातत्याने वाद होत असत. २१ मे रोजी देखील बापलेकात वाद झाले. यातून बापाने संतोषला लाकडी दांड्याने मारहाण सुरु केली. संतोष जीवाच्या आकांताने ओरडत राहिला पण घाव वर्मी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर संतोष मुधोळ घरी जाऊन झोपले. पोलिसांनी ताब्यात घेल्यानंतर मारहाणीत मुलाचा मृत्यू होईल असे वाटले नव्हते असे म्हणत त्याने गुन्हाची कबुली दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली