जिल्ह्यात सातव्या कोरोनाबाधित रुग्णाचे डायलिसिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:17 IST2021-03-29T04:17:27+5:302021-03-29T04:17:27+5:30

हिंगोली : जिल्ह्यात सातव्या कोरोनाबाधित रुग्णाचे डायलिसिस करून त्यास पुढील निगराणीसाठी कोरोना सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. सध्या या कोरोनाबाधित ...

Dialysis of the seventh coronary artery patient in the district | जिल्ह्यात सातव्या कोरोनाबाधित रुग्णाचे डायलिसिस

जिल्ह्यात सातव्या कोरोनाबाधित रुग्णाचे डायलिसिस

हिंगोली : जिल्ह्यात सातव्या कोरोनाबाधित रुग्णाचे डायलिसिस करून त्यास पुढील निगराणीसाठी कोरोना सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. सध्या या कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

यापूर्वी २ ऑक्टोबर २०२० मध्ये पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचे डायलिसिस करण्यात आले होते. हा सातवा कोरोनाबाधित रुग्ण आहे. जिल्ह्यात सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. डायलिसिसची सुविधा नांदेड, परभणी आणि वाशिम येथे आहे; परंतु कोरोनाबाधित रुग्णाचे डायलिसिस तेथे होत नसल्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी हिंगोली येथील जिल्हा रुग्णालय आणि औंढा रोडवरील कोरोना सेंटरवर डायलेसिस करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी तज्ज्ञ डॉक्टर मंडळी नेमण्यात आली आहेत. अतिगंभीर आजाराच्या रुग्णांवर डायलिसिस उपचार करून त्यास बरे करण्यात येते.

हिंगोली येथे २०१४ पासून जिल्हा सामान्य रुग्णालय येथे डायलिसिस विभाग कार्यरत आहे. येथे आतापर्यंत १२ हजार ४६६ रुग्णांचे डायलिसिस करण्यात आले आहे. २ ऑक्टोबर रोजी अशाच एका कोरोनाबाधित रुग्णाचे डायलिसिस करून त्यास जीवदान दिले आहे. यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली २७ मार्च रोजी डॉ. टी.एम. आऊलवार, एजाज पठाण, प्रीती काकडे, परदेशी, कदम, संतोष गिरी यांनी कोरोनाबाधित रुग्णावर डायलिसिस करून त्यास कोरोना सेंटर येथे भरती केले आहे. संबधित रुग्णाची प्रकृती सध्या चांगली असून, तो औषधोपचाराला प्रतिसाद देत आहे.

रुग्णांनी आजार लपवू नये

कोरोना सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना काही वेदना होत असल्यास संबंधित डॉक्टर अथवा नातेवाइकांना कळवून आजाराबाबत सूचना द्यावी. म्हणजे पुढील उपचार करण्यासाठी सोयीचे होईल. कोणताही आजार मनात दडवून ठेवल्यास त्याचा स्वत:बरोबर इतरांना त्रास होत असतो. आपण आपल्या किडनीची काळजी घ्यावी व निरोगी जीवन जगावे.

डॉ. टी. एम. आऊलवार, वैद्यकीय अधिकारी, कोरोना सेंटर, औंढा रोड, हिंगोली.

फोटो नं. ३

Web Title: Dialysis of the seventh coronary artery patient in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.