पूर्वसूचना देऊनही जि. प. अध्यक्षांच्या दौऱ्यात वसमत बीडीओची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:37 IST2021-09-16T04:37:13+5:302021-09-16T04:37:13+5:30
याबाबत जि.प. अध्यक्ष बेले म्हणाले, या बीडीओंच्या बाबतीत वारंवार तक्रारी येतात. यापूर्वीही लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मनमानीच्या, फोन उचलत नसल्याच्या, कामे ...

पूर्वसूचना देऊनही जि. प. अध्यक्षांच्या दौऱ्यात वसमत बीडीओची दांडी
याबाबत जि.प. अध्यक्ष बेले म्हणाले, या बीडीओंच्या बाबतीत वारंवार तक्रारी येतात. यापूर्वीही लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मनमानीच्या, फोन उचलत नसल्याच्या, कामे प्रलंबित ठेवली जात असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. आज मलाही तीच अनुभूती आली. अशा अधिकाऱ्यांची हिंगोली जिल्हा परिषदेला गरज नाही. यावर निश्चितपणे योग्य ती कार्यवाही केली जाईल.
दहा वर्षांतच शाळा मोडकळीस
वसमत तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा गुंज येथील वर्गखोल्यांची समस्या संबंधित जि.प. सदस्य वारंवार मांडत असल्याने प्रत्यक्ष पाहणीस जि.प. अध्यक्ष गणाजी बेले गेले होते. पाहणी केली तर भिंतीला तडे, छत लोंबकळलेले असल्याचे आढळले. ही षटकोणी वर्गखोली दहा वर्षांपूर्वीच सर्व शिक्षा अभियानातून घेतली होती. इतर काहींचे बेहाल झाले. मात्र दहा वर्षांतच ही परिस्थिती झाल्याने या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, या कामास जबाबदार असलेल्यांची नावे निश्चित करावी व हे काम कसे पूर्ण करता येईल, याचा अहवाल देण्यास शिक्षण विभागास सांगण्यात आले.