दिल्लीतील शेतकरी आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST2021-02-05T07:53:39+5:302021-02-05T07:53:39+5:30

भाजपप्रणित केंद्र सरकारने लॉकडाऊन काळात शेतकरी कायदे लागू केले. हे कायदे करताना शेतकरी नेते, शेती तज्ज्ञ, शेती अर्थतज्ज्ञांशी कोणतीही ...

Deprived Bahujan Aghadi supports the farmers' movement in Delhi | दिल्लीतील शेतकरी आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

दिल्लीतील शेतकरी आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

भाजपप्रणित केंद्र सरकारने लॉकडाऊन काळात शेतकरी कायदे लागू केले. हे कायदे करताना शेतकरी नेते, शेती तज्ज्ञ, शेती अर्थतज्ज्ञांशी कोणतीही चर्चा केली नाही. हुकूमशाही पद्धतीने संपूर्ण देशभरात कायदे लागू केले आहेत. या कायद्याचा संपूर्ण देशभरातील शेतकरी विरोध करीत असल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील शेतकरी आंदालनास पाठिंबा म्हणून २७ जानेवारी रोजी राज्यभर आंदोलन करण्यात आले. त्याच धर्तीवर हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी किसान बाग आंदोलन करीत शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शविला. या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भाषणे करत केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर सडकून टिका केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुरेश धोतरे, डॉ. चित्रा कुऱ्हे, महासचिव रविंद्र वाढे, निरीक्षक वसीम देशमुख, सचिव ज्योतीपाल रणवीर, शे. अतिक, मोहन राठोड, मौलाना एजाज बैती, मौलाना मु. इकबाल कासमी, बबन भूक्तार, हाफिज सालार खॉ, हाफीज वाजेद, प्रकाशचंद्र पाठक, रघुवीर सेठी, अनिल कांबळे, बाळासाहेब कांबळे आदीं पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.

फोटो नं. २८

Web Title: Deprived Bahujan Aghadi supports the farmers' movement in Delhi