विभागीय धनुर्विद्या स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:10 IST2018-10-21T00:09:41+5:302018-10-21T00:10:28+5:30
कळमनुरी तालुक्यातील सरस्वती इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धा नुकतीच पार पडली. उद्घाटन आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू अमोल बोरीवाले यांच्या हस्ते केले.

विभागीय धनुर्विद्या स्पर्धा
लोकमत न्यूज नेटवर्क
वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील सरस्वती इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धा नुकतीच पार पडली.
उद्घाटन आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू अमोल बोरीवाले यांच्या हस्ते केले. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडाधिकारी किशोर पाठक तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय बेतेवार, अशोक जंगमे, लक्ष्मीकांत खिची, आर. बी. साळुंके आदी उपस्थित होते.दरम्यान, इंडियन राऊंड, रिकर्व्ह राऊंड, फिटा राऊंड, या प्रकारात स्पर्धा पार पडली आहे. यात औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील विविध वयोगटातील ३०० मुला, मुलींनी सहभाग नोंदविला होता. २३ ते २६ आॅक्टोबरदरम्यान उस्मानाबाद येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.