बोगस बांधकाम बंद करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:38 IST2021-01-08T05:38:28+5:302021-01-08T05:38:28+5:30
शहरातील पोस्ट ऑफिस ते जुने पोलीस स्टेशनपर्यंत नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. कमी ...

बोगस बांधकाम बंद करण्याची मागणी
शहरातील पोस्ट ऑफिस ते जुने पोलीस स्टेशनपर्यंत नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. कमी गजाचा वापर करुन बोगस काम करत आहेत. तसेच नालीमध्ये असलेले जुने गाळ न काढताच त्यावरच नवीन बांधकाम करण्यात येत आहे. यात कामांचा दर्जा खालावला गेला आहे. तसेच या कामाबाबत अनेक तक्रारीही झाल्या आहेत. शहरात सुरु असलेली अनेक विकास कामे ही बोगस होत आहेत. तसेच काही नगरसेवकच गुत्तेदारी करत आहेत. तसेच स्वत:चे प्रभाग सोडून दुसऱ्या प्रभागांमध्ये नगरसेवक काम करीत आहेत, असेही निवेदनात नमूद आहे. सदरील बोगस बांधकाम करणाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.