वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:32 IST2021-09-21T04:32:48+5:302021-09-21T04:32:48+5:30
सवना भागात सोयाबीनचे नुकसान सवना : सवना गावासह परिसरात मागच्या काही दिवसांपासून अधुन-मधून पाऊस पडत आहे. यामुळे सोयाबीनचे नुकसान ...

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
सवना भागात सोयाबीनचे नुकसान
सवना : सवना गावासह परिसरात मागच्या काही दिवसांपासून अधुन-मधून पाऊस पडत आहे. यामुळे सोयाबीनचे नुकसान होत आहे. सखल भागात शेत असलेल्या शेतकऱ्यांचे यावर्षी अतोनात नुकसान झाले आहे. या भागामध्ये शासनाने पिकांचा पंचनामा करावा, अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली. परंतु, अद्याप तरी शासनाचा प्रतिनिधी या भागात आलेला नाही.
‘रस्त्यांची व पुलाची दुरुस्ती करा’
करंजी : वसमत तालुक्यातील करंजी, दारेफळ, विरेगाव आदी गावांतील रस्ते तसेच पुलाची दुरवस्था झाली आहे. थोडा जरी पाऊस पडला तरी वाहने चालविणे अवघड होऊन बसत आहे. काही ठिकाणी तर चालणे देखील कठीण होत आहे. संबंधित विभागाने लक्ष देत रस्त्यांची व पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.