वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST2021-04-18T04:29:04+5:302021-04-18T04:29:04+5:30

रस्त्यांवर खड्डे; वाहनचालक त्रस्त औंढा नागनाथ: तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जागोजागी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना ...

Demand for smooth power supply | वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

रस्त्यांवर खड्डे; वाहनचालक त्रस्त

औंढा नागनाथ: तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जागोजागी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सा. बां. विभागाने याची दखल घेऊन रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी होत आहे.

डासांचे प्रमाण वाढले

शिरडशहापूर: औंढा तालुक्यातील शिरडशहापूर येथील काही वॉर्डातील नाल्या साफ केल्या नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. तसेच नालीमध्ये कचरा साचत असल्यामुळे पाणी रस्त्यावर येत आहे. ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन नाल्या साफ कराव्यात, अशी मागणी होत आहे.

प्रखर ऊन झाले असह्य

करंजी: मागील पंधरा दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे बाहेर पडणेही मुश्कील होऊन बसले आहे. प्रखर उन्हाने ताप येणे, डोके दुखणे आदी आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. एप्रिल महिन्यात ही स्थिती तर मे महिन्यात काय हाल होतील हे सांगणे कठीण आहे.

Web Title: Demand for smooth power supply