तीन गावांसाठी स्वतंत्र फिडर देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:36 IST2021-09-09T04:36:45+5:302021-09-09T04:36:45+5:30
हिंगोली : पानकनेरगाव परिसरातील तीन गावांमध्ये गत ५ वर्षांपासून कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. परिणामी, या गावातील नागरिकांना ...

तीन गावांसाठी स्वतंत्र फिडर देण्याची मागणी
हिंगोली : पानकनेरगाव परिसरातील तीन गावांमध्ये गत ५ वर्षांपासून कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. परिणामी, या गावातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ही गावे पानकनेरगावच्या ३३ केव्ही केंद्राशी जोडण्यात यावी, अशी मागणी माजी शिक्षण सभापती संजय देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पाच वर्षांपासून या भागात वीज पुरवठा अनियमित व कमी दाबाने होत असल्यामुळे विजेवरील उपकरणे जळून जात आहेत. त्यामुळे खैरखेडा, शेगाव खोडके, म्हाळशी ही गावे पानकनेरगाव येथील ३३ केव्ही केंद्राशी जोडण्यात यावी किंवा या गावांसाठी स्वतंत्र फीडर देण्यात यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याबाबत लवकर निर्णय घेतला नाही तर १७ सप्टेंबरपासून तिन्ही गावांतील नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर माजी शिक्षण सभापती संजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.