स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:30 AM2021-01-23T04:30:11+5:302021-01-23T04:30:11+5:30

वळण रस्ते बनले खड्डेमय शिरडशहापूर: ग्रामीण भागातील वळण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहने चालविताना अनेक ...

Demand for sanitation campaign | स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी

स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी

Next

वळण रस्ते बनले खड्डेमय

शिरडशहापूर: ग्रामीण भागातील वळण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहने चालविताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचे अतोनात नुकसान होत आहे. रस्त्यांवरील खड्डे डांबरमिश्रित गिट्टीने बुजवावेत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.

डिग्रस परिसरात तूर काढणी सुरुडिग्रस कऱ्हाळे: हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे व परिसरात मागील पाच-सहा दिवसांपासून तूर काढणी सुरू आहे. शेतकरी मोकळ्या जागी तूर बडवित आहेत. डिग्रस व परिसरात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकामध्ये आंतरपीक म्हणून तुरीची लागवड केली होती. विशेष म्हणजे, गतवर्षीपेक्षा या वर्षी तुरीचे उत्पन्न घटल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

विजेचा लपंडाव;

शेतकरी त्रस्त

पुसेगाव: सेनगाव तालुक्यातील पुसेगाव व परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. वीज वारंवार खंडित होत असल्यामुळे उगवलेल्या पिकांना पाणी देता येत नाही. परिणामी, पिके वाळून जात आहेत. विजेची वाट पाहत शेतकऱ्यांना दिवसभर बसून राहावे लागत आहे. महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन पुसेगाव व परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना

प्रवाशांचे निवेदन

आंबा चोंडी: प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्यांचा रेल्वे प्रशासनाने त्वरित विचार करून त्या सोडवाव्यात, अशी मागणी प्रवाशांनी नांदेडच्या विभागीय व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर जवळपास साठ प्रवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

अकोला ते काचीकुडा, नरखेड ते काचीकुडा या रेल्वे गाडीला वसमत येथे थांबा द्यावा, अकोला ते परळी वैजनाथ, अकोला ते पूर्णा या गाडी या दोन्ही रेल्वे गाड्या दहा महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे या रेल्वे गाड्या नव्याने सुरू कराव्यात, चोंडी रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफार्मची दुरुस्ती करावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. मागण्यांचे निवेदन नांदेडच्या विभागीय व्यवस्थापकांना २१ जानेवारी रोजी प्रवाशांनी दिले आहे. या निवेदनाच्या प्रती केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, खा.हेमंत पाटील, खा.राजीव सातव यांना पाठविल्या आहेत. चोंडी रेल्वे स्टेशनच्या अधीक्षकांना दिलेल्या निवेदनावर सुदाम व्यवहारे, गोविंद भोसले, अर्जुन कांबळे, रशीद पिंजारी, शंकर भोसले, एकनाथ राऊत, वामन गायकवाड, वैजनाथ शिंदे, गंगाधर फेदराम, कैलास फेदराम, तुकाराम वाघारे, जनार्दन भोसले, डॉ.बी.के. पारटकर, सतीश भोसले, भारत भोसले आदी जवळपास साठ प्रवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Demand for sanitation campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.