व्यावसायिक, शेतकरी, मजुरांना मदत करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:31 IST2021-05-20T04:31:42+5:302021-05-20T04:31:42+5:30
निवेदनात म्हटले की, कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने सर्व व्यवहारावर निर्बध घालण्यात आले आहेत. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी घेतलेला निर्णय योग्य ...

व्यावसायिक, शेतकरी, मजुरांना मदत करण्याची मागणी
निवेदनात म्हटले की, कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने सर्व व्यवहारावर निर्बध घालण्यात आले आहेत. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी घेतलेला निर्णय योग्य असला तरी यामुळे व्यापारी, शेतकरी, मजुरांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे व्यावसायिकांना दुकान भाडे भरण्यासाठी बँकांचे हप्ते भरण्यासाठी मार्च ते मे या तीन महिन्याला प्रत्येकी ५ हजारांची मदत करावी, सरसकट वीज बिल माफ करावे, शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्यात यावे, खतावरील दरवाढ मागे घ्यावी, मजुरांनाही प्रत्येकी ३ हजारांची मदत करावी, कृषी उत्पन्न बाजार समिती वेळेत सुरू ठेवावी, बचत गटांनी लघू उद्योग उभारणीसाठी घेतलेले कर्ज भरण्यासाठी कालावधी वाढवून द्यावा, कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पाल्यांना आर्थिक मदत करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर मराठवाडा अध्यक्ष पंडीत तिडके, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश कुटे, शंकरराव देशमुख, ज्योतीताई धुळे, गजानन टेकाळे, अनिल लोंढे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.