या निवेदनात म्हटले की, केंद्र सरकारकडून विविध प्रकारच्या योजना व कायदे आणून शेतकऱ्यांचा छळ मांडला जात असल्याने असंतोष पसरत आहे. कृषी उत्पादनांना मंडीत भाव मिळत नाही, मात्र बाहेर त्याच मालासाठी जास्त भाव मोजावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी मरणाला टेकलेला असताना कृषी उत्पादनांचा व्यापार करणारे गलेलठ्ठ होत आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत अहे. काही भागात शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला म्हणजे देशभरातील शेतकऱ्यांना चांगला लाभ मिळाला, असे म्हणता येणार नाही. शेतकऱ्यांचे शोषण थांबवून त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनावर सुभाष देशमुख, तुळशीराम कोरडे, बालासाहेब चटे, सुदाम गवळी, देवराव इंगळे, जयवंत फडणवीस, सचिन नानवटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शेतीमालाला योग्य भाव देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:36 IST