धनगर महासंघाचे मागणीसाठी साकडे

By Admin | Updated: July 20, 2014 00:25 IST2014-07-19T23:45:07+5:302014-07-20T00:25:32+5:30

हिंगोली : धनगर समाजास एस.टी.प्रवर्गाचे आरक्षण देऊन अनुसूचित जमातीच्या शासकीय सवलती लागू कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र धनगर समाज महासंघ व मल्हार सेनेच्या जिल्हा शाखेतर्फे करण्यात आली आहे.

Demand for Dhangar Mahasangh | धनगर महासंघाचे मागणीसाठी साकडे

धनगर महासंघाचे मागणीसाठी साकडे

हिंगोली : धनगर समाजास एस.टी.प्रवर्गाचे आरक्षण देऊन अनुसूचित जमातीच्या शासकीय सवलती लागू कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र धनगर समाज महासंघ व मल्हार सेनेच्या जिल्हा शाखेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. विलास खरात, लखनराव शिंदे, गजानन डाळ, भास्करराव पोले, आनंदराव खरात, राहुल खरात, विठ्ठल खरात, प्रकाश खरात, मुंजाजी बंडे, समाधान शिंदे, शाम हिरवे, आनंदा बारसे, अमोल कुंभारकर यांनी प्रशासनास हे निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेत धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश असून धनगर व धनगड या दोन वेगळ्या जमाती आहेत, या मुद्दयावरून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. याचा परिणाम धनगर समाज आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक व राजकीय क्षेत्रात इतरांपेक्षा मागास राहिला आहे. २००२ साली चलिया यांच्या अध्यक्षतेखाली घटना पुनर्विलोकन आयोग महाराष्ट्रात आला असता त्यांच्यासमोर धनगर समाजाचे म्हणणे मांडण्यात आले होते. त्यानुसार उत्तर प्रदेशातील हायकोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार धनगर व धनगड हे दोन्ही शब्द एकच अर्थी असल्याचे मान्य केले आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजास एस.टी.प्रवर्गाच्या सर्व सवलती लागू कराव्यात, या मागणीसाठी २० वर्षापासून सनदशीरपणे, लोकशाही मार्गाने अांदोलन करण्यात येत आहे. परंतू केवळ आश्वासनेच दिली जात असल्याने धनगर समाजात असंतोष पसरल्याचेही निवेदनात नमूद आहे.

Web Title: Demand for Dhangar Mahasangh