बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी अर्जाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:24 IST2020-12-25T04:24:13+5:302020-12-25T04:24:13+5:30
अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारीत संस्थामध्ये आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्स, महाराष्ट्र राज्य ...

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी अर्जाची मागणी
अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारीत संस्थामध्ये आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्स, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापित लोकसंचलित साधन केंद्र यांच्या समावेश आहे. तसेच अर्ज सादर करण्यासाठी पात्र खरेदीदारांमध्ये राज्यातील तसेच राज्यबाहेरील कॉर्पोरेट्स/ प्रक्रियादार/ निर्यातदार/ लघु मध्यम उद्योजक/ स्टार्टअप्स/ कोणताही खरेदीदार इ. चा समावेश आहे. प्राप्त होणाऱ्या अर्जापैकी पात्र स्पर्धात्मक व उत्कृष्ट अर्जांना प्रकल्पाचे ६० टक्केपर्यंत अनुदान उपलब्ध होईल. अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना इ. माहिती https://www.smart-mh.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी अर्ज १५ डिसेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्मार्टच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर कराव्यात असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिक्षक यांनी आवाहन केले आहे.