कृषीपंपांना बारा तास वीजपुरवठा देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:39 IST2020-12-30T04:39:40+5:302020-12-30T04:39:40+5:30
इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी साेडण्यात येत असल्यान हजारो हेक्टर जमीन ओलीताखाली येते. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याची गरज ...

कृषीपंपांना बारा तास वीजपुरवठा देण्याची मागणी
इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी साेडण्यात येत असल्यान हजारो हेक्टर जमीन ओलीताखाली येते. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याची गरज असतांना वीजपुरवठा सुरळीत केला जात नाही. या परिसरातील विद्युत पंपाला पाच तास वीजपुरवठा करण्याचा नियम केला. मात्र या नियमामध्येही वीजपुरवठ्याचा वेळ आढळून बदलून देण्यात आली आहे. त्यातच पिकांना पाण्याची अतिआवश्यकता असताना वीजपुरवठा सतत खंडित हाेत आहे. त्यातच वीज अधून - मधून जात आहे. यामुळे राेहित्रात बिघाड हाेण्याच्या घटना वारंवार हाेत आहेत. तसेच पाच तासाच्या वीजपुरवठ्यात वीजही कमी दाबाने येत असल्यामुळे विद्युत मोटारी चालत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी इंजिनद्वारे पिकांना पाणी देत आहेत. यासाठी वीजवितरण कंपनीने शेतीतील विद्युत पंपांना बारा तास वीजपुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून केली आहे.