अनोळखी जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:55 IST2021-02-05T07:55:26+5:302021-02-05T07:55:26+5:30

औंढा ते नांदेड जाणाऱ्या महामार्गावरील कौठा टी पॉईंटजवळ १७ डिसेंबर २०२० रोजी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ६० वर्षीय ...

Death of an unidentified injured person during treatment | अनोळखी जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

अनोळखी जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

औंढा ते नांदेड जाणाऱ्या महामार्गावरील कौठा टी पॉईंटजवळ १७ डिसेंबर २०२० रोजी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ६० वर्षीय व्यक्ती जखमी पडल्याची माहिती वसमत ग्रामीण पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता जखमी व्यक्तीस नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान जखमी व्यक्तीचा ७ जानेवारी रोजी मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी जखमी व्यक्तीने त्याचे नाव बाबूराव सोपान गायकवाड असे सांगितले. परंतु, गाव व नातेवाईकाबाबत काही सांगितले नाही. केवळ गोदावरी नदीकाठचा असल्याचे सांगितले. याप्रकरणी यादव वाघमारे यांच्या खबरीवरून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान, मयताच्या अंगावर पांढरे धोतर असून मयत ओळखीचा असल्यास पाेलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Death of an unidentified injured person during treatment