शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

सीझरनंतर स्टाफ नर्सचा मृत्यू; दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 19:32 IST

रुग्णवाहिकेत मृतदेह ठेवून ‘सीएस’च्या दालनापुढे नातेवाईकांचा ठिय्या

हिंगोली : जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांनी सिझर व्यवस्थितरित्या केले नसल्यामुळे स्टाफ नर्सचा मृत्यू झाला, असा आरोप करत नातेवाईकांनी ५ एप्रिल रोजी ‘सीएस’ यांच्या दालनापुढे पाच-सहा तास ठिय्या मांडला. याप्रकरणी दुपारी साडेचार वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

संध्या सचिन धाबे (मोरे) या हिंगोली जिल्हा रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून कार्यरत होत्या. त्यांना २ एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात सिझरसाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळेस त्यांची प्रकृती चांगली होती. त्यानंतर त्यांचे सिझर करण्यात आले. परंतु, प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुढील उपचारार्थ नांदेडला हलविण्यात आले. नांदेड येथील सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. परंतु, त्यांचा ४ एप्रिल रोजी नांदेड येथे मृत्यू झाला. हिंगोली जिल्हा रुग्णालयात सिझर व्यवस्थितरित्या केले असते, तर संध्या मोरे यांचा मृत्यू झाला नसता, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांनी सिझर करतेवेळेस निष्काळजीपणा केला, त्यामुळे संध्या मोरे यांचा मृत्यू झाला. यासाठी ५ एप्रिल रोजी नातेवाईकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनासमोर पाच-सहा तास ठिय्या मांडला. जोपर्यंत डॉ. राठोड व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह रुग्णवाहिकेतच राहील, तो आम्ही घरी नेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. ॲड. प्रज्ञावंत मोरे, छाया मोरे, दीपक मोरे, वर्षा मोरे, किरण मोरे, सचिन ठोके, ॲड. प्रसन्नजित भगत, कैलास बनसोड आदी उपस्थित होते.

पोलीस चौकीत नातेवाईकांना बोलावले...मृतदेह नातेवाईकांनी जिल्हा चिकित्सकांच्या दालनासमोर ठेवल्याचे समजताच पोलीस त्या ठिकाणी आले. त्यांनी नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर काही मोजक्याच नातेवाईकांना पोलीस चौकीत बोलावले. काही नातेवाईक मात्र दालनातच बसून होते. दुपारी साडेचार वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

...तर कारवाई केली जाईलसंध्या मोरे यांचे सिझर डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी व्यवस्थितरित्या केले नसेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. नियम सर्वांना सारखे आहेत.- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक

चार दिवसांच्या बाळाची प्रकृती चांगली...सिझर केल्यानंतर संध्या मोरे यांना कन्यारत्न झाले. या मुलीची प्रकृती चांगली आहे. या बाळाला आजीजवळ ठेवण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली