दाटेगाव म्हणजे स्वच्छतेची पंढरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:13 IST2021-01-24T04:13:39+5:302021-01-24T04:13:39+5:30
हिंगाेली : वारकऱ्यांची पंढरी म्हणजे पंढरपूर तर स्वच्छतेची पंढरी म्हणजे, दाटेगांव ग्रामपंचायत असे उद्गार विभागीय उपआयुक्त सुरेश बेदमुथा यांनी ...

दाटेगाव म्हणजे स्वच्छतेची पंढरी
हिंगाेली : वारकऱ्यांची पंढरी म्हणजे पंढरपूर तर स्वच्छतेची पंढरी म्हणजे, दाटेगांव ग्रामपंचायत असे उद्गार विभागीय उपआयुक्त सुरेश बेदमुथा यांनी दाटेगांव येथे एका वर्षात झालेल्या बदलाची पाहणी करून गाैरवाेद्गार काढले आहे. दाेन वर्षांपासून दाटेगांव येथील नागरिकांनी गावातील स्वच्छता, वृक्ष लागवड, स्मशानभूमीमध्ये वृक्ष लागवड, भाजीपाला, मजुरांना रोजगार, एक गाव एक कलर, सांडपाणी व्यवस्थापन, उकिरडा, शौचालयमुक्त गाव(??) हे कार्यक्रम राबविल्यामुळे ‘स्वच्छ गाव सुंदर माझे गाव’ या कार्यक्रमांतर्गत भेट दिली. येथील गावकऱ्यांनी कमी कालावधीत एकजुटीने जे कार्य केले, ते काैतुकास पात्र आहे.
दाटेगांवच्या विकासासाठी सर्वोतोपरी कार्य करून जिल्ह्यात नव्हे तर राज्यामध्ये एक नंबरचे गाव मॉडेल तयार करण्यास सहकार्य करणार असल्याचे विभागीय उपआयुक्त सुरेश बेदमुथा यांनी सांगितले. यावेळी सर्व दाटेगांव येथील महिलांसह पुरुषांची माेठ्या संख्येने उपस्थिती हाेती. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, गट विकास अधिकारी मिलिंद पोहरे, विस्तार अधिकारी विष्णू भोजे, शाखा अभियंता लहाने यांची उपस्थिती हाेती. फाेटाे नं ०३