लोहगाव येथे गोठ्याला आग लागून नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:30 IST2021-04-25T04:30:02+5:302021-04-25T04:30:02+5:30

डिग्रस कऱ्हाळे : येथून जवळच असलेल्या लोहगाव शिवारातील गट क्र. २३२ मधील शेतकरी रामकिसन सखाराम कदम यांच्या शेतातील गोठ्यास ...

Damage due to fire at the cowshed at Lohgaon | लोहगाव येथे गोठ्याला आग लागून नुकसान

लोहगाव येथे गोठ्याला आग लागून नुकसान

डिग्रस कऱ्हाळे : येथून जवळच असलेल्या लोहगाव शिवारातील गट क्र. २३२ मधील शेतकरी रामकिसन सखाराम कदम यांच्या शेतातील गोठ्यास २३ एप्रिल शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास अचानक आग लागून दोन लाखाचे नुकसान झाले आहे.

या गोठ्यात असलेल्या ८० कोंबड्या, एक शेळी दगावली आहे. तसेच गोठ्यालगत असलेले स्प्रिंकलर पाईप ३०, तीन क्विंटल कोंबड्याचे खाद्य, दोन सिलिंग पंखे, सहा प्लास्टिक ताडपत्री, एक फवारा यासह संसाराेपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती सरपंच नागेंद्र पुरी यांनी तलाठी गजानन रणखांब यांना कळविली. या घटनेचा पंचनामा करण्यात आला. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून त्वरित मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी कदम यांनी केली.

फाेटाे नं. २८ आहे.

Web Title: Damage due to fire at the cowshed at Lohgaon