मानव विकासमधील सायकली प्रस्तावातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:40 IST2021-02-27T04:40:40+5:302021-02-27T04:40:40+5:30
दरवर्षीच हे प्रस्ताव दाखल करण्यासह हा निधी खर्च करण्यासाठी विलंब होतो. बारावीच्या मुलींना तर अनेकदा या योजनेचा लाभ घेण्याची ...

मानव विकासमधील सायकली प्रस्तावातच
दरवर्षीच हे प्रस्ताव दाखल करण्यासह हा निधी खर्च करण्यासाठी विलंब होतो. बारावीच्या मुलींना तर अनेकदा या योजनेचा लाभ घेण्याची गरजच उरत नाही. काहींना पूर्वीच लाभ मिळालेला असल्याने आठवीतीलच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने यात पात्र ठरतात. मात्र त्यांनाही पहिल्या वर्षी शेवटपर्यंत या सायकलींचा लाभ मिळत नाही.
कोरोनामुळे बुडित मजुरीचा लाभही कमीच
यंदा मानव विकास मिशनमध्ये बुडित मजुरीचे प्रस्ताव त्या तुलनेत आले नाहीत. कोरोनाचा परिणाम या योजनेवर झाला आहे. प्रसूतींची संख्या कमी झाली नसली तरीही या योजनेचा लाभ मात्र अवघ्या ६१८ महिलांनी घेतला आहे. यंदा २३१८ एवढे उद्दिष्ट होते, तर ७३.९२ लाखांचा निधी उपलब्ध आहे. गतवर्षी या योजनेत २१९९ महिलांना ८७.९५ लाखांची बुडित मजुरी देण्यात आली होती.